आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्रपट महोत्सव:अमीरा’ मुळे अरब देशांत गदारोळ, चित्रपटात मुलीकडून जैविक पित्याच्या शोधाचा संघर्ष

इजिप्त अल गुना / अजित रायएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • इस्रायलच्या तुरुंगात बंद पॅलेस्टाइन कैद्यांच्या स्पर्मच्या तस्करीतून हजाराे मुलांचा जन्म

इजिप्तच्या अल गूना चित्रपट महाेत्सवात माे. दियाब यांचा चित्रपट ‘अमीरा’ झळकल्यानंतर अरब देशांत खळबळ उडाली आहे. चित्रपटात इस्रायलच्या तुरुंगात बंद पॅलेस्टाइन राजकीय कैद्यांच्या स्पर्मची तस्करी हाेत आहे. त्यामुळे कैद्यांच्या पत्नी मातृत्वसुख मिळवू लागल्या आहेत. पॅलेस्टाइन-इस्रायल संघर्षादरम्यान २०१२ पासून आतापर्यंत हजाराे मुलांचा जन्म स्पर्मच्या तस्करीतून झाला आहे. हा चित्रपट कुटुंब, रक्तसंबंधाच्या परिभाषेबद्दलची चर्चा, परदेशी व्यक्तीबद्दलचा भेदभाव आणि तिरस्काराच्या मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित करताे. चर्चा घडवताे. चित्रपटाच्या कथानकात तुरुंगात कैद पॅलेस्टाइन आंदाेलक नुवारची १७ वर्षीय मुलगी अमीराला आपला जन्म तस्करी करून आणलेल्या स्पर्ममधून झाल्याचे वाटते. ती आई वारदासह अनेक वेळा वडिलांना तुरुंगात भेटायला जाते. नुवार पुन्हा आपले स्पर्म तस्करीच्या माध्यमातून पत्नी वारदापर्यंत पाेहाेचवताे.

या माध्यमातून आपली तुरुंगातून सुटका हाेत आहे, असे नुवारला वाटत असते. परंतु रुग्णालयात स्पर्मची तपासणी हाेते. तेव्हा त्यांच्या जीवनात वादळ येते. नुवारमध्ये वडील हाेण्याची क्षमताच नाही, असे त्यातून निदान हाेते. त्यानंतर कुटुंब संशय असलेल्या प्रत्येक व्यक्तीची डीएनए तपासणी करून घेते. अमीराचे जीवन जणू विस्कटून जाऊ लागते. तिची आई वारदा सगळ्या गाेष्टी साेसते. अमीरा देखील सगळ्या परिस्थितीला सामाेरी जाते. एक इस्रायली नागरिक तिचे वडील आहेत, याची माहिती अमीराला मिळते. हा व्यक्ती पॅलेस्टाइन मुक्ती माेर्चासाठी खबऱ्याचे काम करत हाेता. अमीराचे काका तिला पासपाेर्ट तयार करून इजिप्तला वास्तव्याला जाण्यास सांगतात. परंतु अमीरा एेकत नाही आणि ती फेसबुकवर आपल्या जैविक वडिलांना शाेधून काढते. इस्रायली रक्त असूनही ती खऱ्या देशभक्तासारखे पॅलेस्टाइनसारखे जगू इच्छिते. बेकायदा इस्रायलच्या सीमेत प्रवेश करताना तिचा मृत्यू हाेताे. माेहंमद दियाब इजिप्तचे सर्वात लाेकप्रिय निर्माते आहेत.

बातम्या आणखी आहेत...