आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुर्कीतील हागिया सोफिया मशीद:चर्चची मशीद, संग्रहालय, पुन्हा मशीद बनलेल्या हागिया सोफियात 87 वर्षांनंतर ईदनिमित्त नमाज

इस्तंबूलएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • हागिया सोफियाला दरवर्षी 40 लाख लोक भेट देतात
  • सहाव्या शतकातील बायजेंटाईन सम्राट जस्टिनियने वास्तूचे चर्च बनवले होते

तुर्कीच्या इस्तंबूल येथील हागिया सोफिया मशिदीत ८७ वर्षांनंतर पहिल्यांदा ईदच्या निमित्ताने नमाज अदा झाली. गुरुवारी सुमारे ५ हजार लोकांची मशिदीत उपस्थिती होती.

सामुदायिक प्रार्थना झाली. यादरम्यान लोकांनी कोविड-१९ च्या नियमांचेही पालन केले. १५०० वर्षांपूर्वीची ही इमारत युनेस्कोच्या वारसा स्थळाच्या यादीत आहे. ही इमारत वर्षानुवर्षे वादात राहिली. ही वास्तू आधी ९०० वर्षे चर्च होती. त्यानंतर या वास्तूचे रुपांतर मशिदीत झाले. ही ५०० वर्षे मशीद होती. १९३४ मध्ये या वास्तूचे रुपांतर संग्रहालयात झाले. परंतु गेल्या वर्षी वाद वाढला. तो कोर्टात गेला. न्यायालयाच्या निवाड्यात ८६ वर्षांनंतर ही वास्तू पुन्हा मशीद करण्यात आली. आता ही वास्तू मशीद राहील, असे कोर्टाने बजावले.

बातम्या आणखी आहेत...