आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टोकियो:फिट राहण्यासाठी वृद्ध कामात व्यग्र! जपानमध्ये निवृत्तीनंतर आठवड्यात 20 तासांचे काम

टोकियो3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

निवृत्तीनंतर अनेक वेळा निवांत क्षण घालवण्याचे ठरवले जाते. परंतु जपानमधील वृद्ध मंडळी निवृत्तीनंतर तंदुरुस्त राहण्यासाठी स्वत:ला कामात व्यग्र ठेवत आहेत. आठवड्यातील वीस तास ते कामात घालवतात. जपानचा जन्मदर तसा फार कमी आहे. त्यामुळे देशात तरुणांची संख्या कमी आहे. वर्क फाेर्समधील तरुण वर्ग कमी आहे. ६५ वर्षीय अत्सुकाे कासा निवृत्त झाल्या. त्यानंतर त्यांनी घरी बसून नातू-पणतूसाेबत खेळत बसायचे नाही, असे ठरवले. म्हणूनच त्यांनी जपानमधील सात लाखांवर वरिष्ठ नागरिकांसारख्या सिल्व्हर संघटनेत स्वत:ची नाेंदणी केली. कासा म्हणाल्या, मला इतरांची मदत करायची आहे. समाजाला काहीतरी द्यायचे आहे. त्यासाठी दिव्यांग लाेकांच्या सं‌घटनेशी स्वत:ला जाेडले. तेथे त्या स्वयंपाकाच्या कामात मदत करतात.

प्रत्येकी चारपैकी एक जपानी ६५ वर्षांहून जास्त वयाचा आहे. पुढील १५ वर्षांत दर तीनपैकी एक जपानी ६५ वर्षांहून जास्त वयाचा असेल. जपानची लाेकसंख्येच्या वृद्ध हाेण्याचे प्रमाण जर्मनीहून दुप्पट व फ्रान्सपेक्षा चारपट आहे. जपानच्या सरकारने निवृत्तीचे वय ६५ वर्षांहून वाढवून ७० वर्षे केले आहे. जपानला वर्कफाेर्सची कमतरता भासू नये. जपानच्या वरिष्ठ नागरिकांना देखील देशासाठी आपले याेगदान देता यावे यासाठी याेग्य संधी दिली जाते. टाेकियाे विद्यापीठाचे प्राे. हिराेशी याेशिडा म्हणाले, वृद्धांमध्ये काम करण्याविषयी असलेली आवड सातत्याने वाढत असल्याचे दिसून येते.

१०० वर्षांच्या वयस्करांचीही नाेंदणी
सिल्व्हर जिनजाई संघटनेचे अध्यक्ष तकाआे आेकाडा म्हणाले, दरवर्षी जास्तीत जास्त वयस्कर आता आपली नाेंदणी करू शकतात. संघटनेतील सर्वात वयस्कर सदस्याचे वय १०० वर्षे आहे. वृद्ध लाेक दर आठवड्याला २० तास काम करतात. दर आठवड्याला दाेन किंवा तीन दिवस काम करतात. स्वच्छता कामगार, रिसेप्शन, सुतार काम, बेबी सिटिंगचे काम करतात.

बातम्या आणखी आहेत...