आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइलेक्ट्रिक व्हेइकलला (ईव्ही) प्राेत्साहन देण्यासाठी अनेक देशांची सरकारे प्रयत्न करत आहेत. परंतु युराेपीय देश स्वित्झर्लंडने वीज संकट लक्षात घेऊन ईव्हीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. अशा प्रकारचा निर्णय घेणारा पहिला देश ठरला आहे. याबाबत सरकारने प्रस्ताव तयार केला आहे. त्यात म्युझिक कॉन्सर्ट््स, थिएटर, क्रीडा स्पर्धांच्या आयोजनावरही बंदीचा प्रस्ताव आहे.
{इलेक्ट्रिक वाहनांवर बंदीची वेळ का आली? स्वित्झर्लंड आपल्या गरजांची पूर्तता करण्यासाठी सर्वाधिक हायड्राे पाॅवरवर अवलंबून आहे. देशाची ६० टक्के वीज यातून मिळते. परंतु थंडीच्या काळात त्याची निर्मिती अतिशय मंदगतीने हाेते. स्वित्झर्लंडमध्ये विजेची पूर्तता शेजारी देश जर्मनी, फ्रान्समधून केली जाते. परंतु आता जर्मनी, फ्रान्स या दाेन्ही देशांत वीज संकट दिसते. त्यामुळे सरकारला इलेक्ट्रिक वाहनांवर बंदी घालावी लागत आहे.
{ईव्हीचा वापर पूर्णपणे बंद हाेईल? प्रस्तावानुसार सामान्यांना यातून काही प्रमाणात सवलत मिळू शकते. स्वित्झर्लंड एलकामच्या म्हणण्यानुसार एखाद्याला अत्यावश्यक प्रवास करायचा असल्यास आणि इतर वाहनांची साेय नसल्यास ईव्ही चार्जिंगची परवानगी दिली जाऊ शकते.
{वीज संकटाला रशिया-युक्रेन युद्ध कारणीभूत? हाेय. रशिया-युक्रेन युद्धामुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. फ्रान्स, स्वित्झर्लंड या देशांनाही फटका बसला आहे. फ्रान्सची वीज कंपनी ईडीएफची वीज निर्मिती आण्विक संयंत्राच्या अभावी गेल्या तीस वर्षांतील सर्वात कमी ठरली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.