आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेची गुप्तचर संस्था सीआयए कारवाई:दहशतवादी जवाहिरीचा खात्मा , अमेरिकेचे 6 ब्लेडचे निंजा क्षेपणास्त्र

वॉशिंग्टन11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
आरएक्स-९ हेलफायर क्षेपणास्त्र - Divya Marathi
आरएक्स-९ हेलफायर क्षेपणास्त्र

अल-कायदाचा म्हाेरक्या अल जवाहिरीचा खात्मा करण्यासाठी अमेरिकेची गुप्तचर संस्था सीआयएने आरएक्स-९ हेलफायर क्षेपणास्त्र डागले. हे वाॅरहेट-लेस क्षेपणास्त्र आहे. हे क्षेपणास्त्र केवळ दिलेले लक्ष्य उद्ध्वस्त करण्याचे काम करते. त्याचा बहुतांश वापर हा घरात दडून बसलेल्या दहशतवाद्याला नष्ट करणे किंवा पळून जाणाऱ्या दहशतवाद्यांना निशाणा करण्यासाठी केला जाताे.

तुलनेत हे वेगळे, कारण यात दारूगोळा कमी :इतर क्षेपणास्त्रांच्या तुलनेत या क्षेपणास्त्रासाठी दारूगाेळा कमी लागताे. परंतु त्यात ब्लेड्स व धारदार धातूंचा जास्त वापर केला जाताे. स्फाेटकांच्या साह्याने ब्लेडला निशाण्यापर्यंत पाेहाेचवता येते. या ब्लेड इमारतींपासून वाहनांपर्यंत अशा अडथळ्यांना भेदून ठराविक ठिकाणी पाेहाेचतात. या क्षेपणास्त्राचे वजन केवळ ४५ किलाेग्रॅम असते. त्यामुळे त्यास निंजा बाॅम्ब तसेच फ्लाइंग गिन्सूदेखील म्हटले जाते. मार्शल कलाकार बहुतेक वेळा अशा धारदार शस्त्रांचा वापर करतात. म्हणून त्याला निंजा म्हटले जाते. फ्लाइंग गिन्सू म्हणजे उडणारी सुरी. या क्षेपणास्त्रामुळे लक्ष्य वगळता इतर भागाची हानी हाेत नाही. हे क्षेपणास्त्र एक-दाेन व्यक्तीला लक्ष्य करण्यासाठी वापरले जाताे. क्षेपणास्त्र हेलफायरची लांबी १.६ मीटर व व्यास ७ इंच आहे.

अटकळी : २०२० मध्ये मृत्यू, नंतर व्हिडिआे अल-जवाहिरी ठार झाल्याचे वृत्त २०२० मध्ये झळकले होते. त्याची प्रकृती ठिक नव्हती. कदाचित त्याचा मृत्यू झाला असावा, असे अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी देखील स्पष्ट केल्याचे वृत्तात म्हटले होते. परंतु त्याचवर्षी अचानक अल-जवाहिरी एका व्हिडिआेमध्ये दिसून आला होता. त्याने टेप व्हिडिआेच्या माध्यमातून आग आेकली होती. तेव्हा भारतातील कथित हिजाब वादावर बोलत होता.

इजिप्तचा सैफ अल-अदल म्होरक्या शक्य, तुर्कस्तानी सैन्यातील अनुभव -अल-जवाहिरीचा खात्मा झाल्यानंतर इजिप्तचा दहशतवादी सैफ अल-अदल नवा म्होरक्या होऊ शकतो. सैफ अल-अदल याला इब्राहिम मक्कावी या नावाने देखील आेळखले जाते. टांझानिया व केनियातील अमेरिकन चर्चवर हल्ले झाले होते. तेव्हा अदल चर्चेत आला होता. १९९८ मधील हल्ल्याचा मास्टरमाइंड हाच होता. -अल-कायदाच्या मजलिस-ए-शूराचा अदल हा सदस्य आहे. तो दहशतवाद्यांना लष्करी प्रशिक्षण देतो. तुर्कस्तानच्या सैन्यात तो होता.

बातम्या आणखी आहेत...