आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

15 देशांच्या प्रतिकात्मक महाराणी होत्या एलिझाबेथ:दर बुधवारी PM सोबत घेत होत्या गुप्त बैठक; सरकारी कामावरही होती नजर

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिटनवर सर्वाधिक काळापर्यंत राज्य करणाऱ्या ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे निधन झाले. त्या केवळ ब्रिटनच नव्हे तकर 14 अन्य स्वतंत्र देशांच्याही महाराणी होत्या. हे सर्वच देश केव्हा न केव्हा तरी ब्रिटीश हुकूमतीच्या अधिपत्याखाली होते.

दिव्य मराठी एक्सप्लेनरमध्ये आपण जाणून घेऊया की क्वीन एलिझाबेथ द्वितीय केवळ सांगण्यापुरत्या महाराणी का होत्या? ब्रिटन व दुसऱ्या देशांसंबंधी त्यांच्याकडे कोणते अधिकार होते? याची माहिती

प्रश्न: एलिझाबेथ II राणी होत्या. पण प्रतीकात्मक, असे का?

उत्तरः ब्रिटीश राणी एलिझाबेथ II एक घटनात्मक राणी होत्या. त्या युनायटेड किंगडमच्या प्रमुख होत्या. आता त्यांची जागा घेणारे चार्ल्सही याच प्रकारचे प्रतिकात्मक राजे असतील. बरोबर भारताच्या राष्ट्रपतींसारखे. पण दोघांमध्ये एक मोठे अंतर आहे. भारताचे राष्ट्रपतींची देशाच्या जनतेने निवडलेल्या लोकप्रतिनिधी म्हणजे खासदार व आमदारांच्या माध्यमातून निवड होते.

तर राजेशाही असल्यामुळे ब्रिटनचा राजा किंवा महाराणीची निवड शाही वंशातून होते. सामान्यतः राजा किंवा राणी सर्वात मोठे अपत्य हेच त्यांच्या निधनानंतर शाही गादीवर बसते. याच कारणामुळे लोकशाही देश असूनही भारत एक प्रजासत्ताक देश आहे. तर ब्रिटन एक राजेशाही देश आहे.

भारताचे राज्यप्रमुख म्हणजे राष्ट्रपती व ब्रिटनच्या राजा-राणीत एक मोठी समानता आहे. हे दोन्ही पद व प्रतिष्ठा प्रतीकात्मक आहेत. ब्रिटनचे राजे असो किंवा भारताकचे राष्ट्रपती दोघांनाही काही अपवाद वगळता सर्वच काम पंतप्रधान किंवा त्यांच्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार करावे लागते. बहुतांश प्रकरणांत हा सल्ला बंधनकारक असतो. म्हणजे राजा-राणी किंवा राष्ट्रपती त्यांच्या नुसारच निर्णय घ्यावे लागतात.

ब्रिटनच्या नव्या राजाला आता किंग चार्ल्स तृतीय नावाने ओळखले जाईल. नवे राजे म्हणून त्यांना काय म्हटले जाईल, हा राजे चार्ल्स तृतीय यांचा पहिला निर्णय असेल. परंपरेनुसार ते आपल्यासाठी चार्ल्स, फिलिप, ऑर्थर किंवा जॉर्ज या 4 पैकी एका नावाची निवड करू शकतात.

प्रश्न : ब्रिटनच्या महाराणीकडे कोणती कामे होती. आता ते काम कोण करणार?

उत्तर : ब्रिटनच्या प्रमुख असल्यामुळे सरकार दररोज एका लाल चामडीच्या बॉक्समध्ये राणी किंवा राजाकडे अत्यावश्यक दस्तावेज पाठवत असते. या दस्तावेजांत सर्वच ठळक राजकीय स्थिती, आवश्यक बेठकांचे सर्वच दस्तावेजांचा समावेश असतो. त्यावर त्यांची स्वाक्षरी अत्यावश्यक असते.

पंतप्रधान सामान्यतः दर बुधवारी बकिंघम पॅलेसमध्ये राणींची भेट घेत होते. त्यात त्यांना सरकारी कामांची औपचारिकपणे माहिती देत होते. ही बैठक पूर्णतः गोपणीय असते. त्यात काय घडते, याची कोणतीही नोंद होत नाही. त्यांच्याकडे हे 5 प्रमुख कामे असतात...

सरकारची नियुक्तीः सार्वत्रिक निवडणूक जिंकणाऱ्या पक्षाच्या नेत्याला सामान्यतः बकिंघम पॅलेसला बोलावण्यात येते. तिथे त्यांना सरकार स्थापन करण्यासाठी औपचारिकपणे निमंत्रित केले जाते. त्यानंतर याच प्रकारे सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी सरकार भंगही केले जाते.

संसदेत भाषणः महाराणी संसदीय वर्षाची सुरूवात राज्य उद्घाटन समारंभाने करतात. यावेळी हाऊस ऑफ लॉर्ड्समधील सिंहासनावरून त्या भाषण केतात. त्यात त्या सरकारच्या धोरण व योजनांची माहिती देतात. हे भारताच्या राष्ट्रपतींच्या अभिभाषणासारखेच असते. 2022 मध्ये महाराणी एलिझाबेथ यांच्यावतीने प्रिंस चार्ल्स यांनी संसदेत भाषण दिले होते.

शाही मंजुरी: संसदेत पारित कोणत्याही विधेयकाचे कायद्यात रुपांतर होण्यासाठी त्याच्यावर राणीची औपचारिक स्वाक्षरी होणे गरजेचे आहे. भारतातही कोणत्याही विधेयक पारित झाल्यानंतर त्याचे कायद्यात रुपांतर होण्यासाठी त्याच्यावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी होणे गरजेचे असते. शेवटच्यावेळी 1708 मध्ये राजाने एका कायद्याला परवानगी देण्यास नकार दिला होता.

पाहुण्यांचा आदरसत्कारः राणी दुसऱ्या देशांच्या पाहुण्या राष्ट्राध्यक्षांचा आदर सत्कार करते. त्या ब्रिटनमध्ये तैनात परदेशी सरकारांचे राजदूत व उच्चायुक्तांचीही भेट घेतात.

घटनात्मक प्रमुख - राणी 600 हून अधिक चॅरिटी, मिलिट्री असोसिएशन, प्रोफेश्नल संस्था व पब्लिक सेवा संघटनेच्याही प्रमुख होत्या. राणी राष्ट्रकूलमध्ये सहभागी 14 देशांच्या प्रमुख होत्या. यात ऑस्ट्रेलिया व कॅनडा सारख्या देशांचा समावेश आहे.

राणी एलिझाबेथ मागील 70 वर्षांपासून हेच सर्व काम करत होत्या. आता या सर्व कामांची जबाबदारी नवे राजे चार्ल्स यांच्याकडे असेल.

एलिझाबेथ द्वितीय यांनी 6 सप्टेबर रोजीच लिझ ट्रस यांना पंतप्रधानपदाची शपथ दिली होती.
एलिझाबेथ द्वितीय यांनी 6 सप्टेबर रोजीच लिझ ट्रस यांना पंतप्रधानपदाची शपथ दिली होती.

प्रश्न : एलिझाबेथ ब्रिटनशिवाय दुसऱ्या कोणत्या देशाच्या महाराणी होत्या?

उत्तर : महाराणी एलिझाबेथ ब्रिटनसह 14 कॉमनवेल्थ देशांच्या महाराणी होत्या. आता किंग चार्ल्स या देशांचे राजे असतील.

कॉमनवेल्थ असूनही 2021 मध्ये बार्बाडोसनेही भारतासारखे स्वतःला प्रजासत्ताक घोषित केले. त्यानंतर अँटिग्वा व बार्बुडा, बहामास, जमैका व सेंट किट्स-नेव्हिसनेही प्रजासत्ताक होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

या देशांमध्ये महाराणी किंवा राजाचे अधिकार अत्यंत प्रतीकात्मक असता. बहुतांश देशांतील राजकीय निर्णय तेथील निवडून आलेल्या संसदेद्वारे घेतले जातात व पंतप्रधान ते लागू करतात. म्हणजे महाराणी देशाच्या प्रमुख असतात. पण सरकारच्या प्रमुख नसतात.

राणीची काही संवैधानिक कर्तव्ये आहेत, त्यापैकी सर्वात महत्वाचे म्हणजे नवीन सरकारांची मान्यता. ही कर्तव्ये देशानुसार बदलतात. उदाहरणार्थ, कायद्याला औपचारिक मान्यता देणे, काही अधिकाऱ्यांची नियुक्ती करणे व राष्ट्रीय सन्मान बहाल करणे.

प्रश्‍न: ब्रिटीश राजवट आपल्या अधीन असणाऱ्या 14 सरकारांच्या सर्व निर्णयांचे पालन करण्यास बांधील आहे का?

उत्तर : घटनात्मक राजेशाही असल्यामुळे ब्रिटनच्या महाराणी किंवा राजाला आपल्या अधीन असणाऱ्या निवडून येणाऱ्या सरकारांचे सर्वच निर्णय मान्य करावे लागतात. पण काही अत्यंत असामान्य स्थितीतच क्राउनकडे सरकारचा निर्णय फेटाळण्याचाही अधिकार असतो.

दुसऱ्या महायुद्धानतंर असे एकदाही झाले नाही. 1975 मध्ये ऑस्ट्रेलियात एक घटनात्मक संकट निर्माण झाले होते. त्यात महाराणींनी नियुक्त केलेल्या गव्हर्नर जनरल यांनी तत्कालीन पंतप्रधानांना निलंबित केले होते.

वार्षिक 800 कोटींचा खर्च

ब्रिटीश राजेशाही भलेही प्रतिकात्कम असली तरी शाही कुटुंबाचा खर्च अत्यंत मोठा असतो. 2020-21 मध्ये ब्रिटनच्या सरकारी तिजोरीतून राणी किंवा शाही कुटुंबावर 86.3 दशलक्षघ पाउंड म्हणजे जवळपास 790 कोटींचा खर्च करण्यात आला. यात त्यांच्या सुरक्षेच्या खर्चाचा समावेश नाही. पण हा पैसा शाही कुटुंबाच्या प्रॉपर्टी बिझनेसमधून येतो. ही शाही कुटुंबाच्या नावाने असणारी सरकारी संपत्ती असते. म्हणजे त्यांना ही विकता येत नाही.

बातम्या आणखी आहेत...