आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराट्विटरचे प्रमुख व अब्जाधीश एलॉन मस्क यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना ट्विटरवर फॉलो केले आहे. एलॉन मस्क ट्विटरवर फॉलो करत असलेल्या 195 जणांच्या यादीचा एक स्क्रिनशॉट सोमवारी व्हायरल झाला. यात मस्क फॉलो करत असलेल्यांच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नावही दिसते.
टेस्लाच्या भारतात आगमनाशी जोडला संबंध
मस्क यांच्या फॉलो यादीचे हे अपडेट एलॉन अलर्टस नावाच्या ट्विटर खात्यावरून शेअर करण्यात आले. हे खाते मस्क यांच्या अकाऊंट अॅक्टिव्हिटीवर निगराणी ठेवते. अनेकांनी यावर लगेचच प्रतिक्रिया देताना टेस्ला भारतात येण्याचे हे संकेत असल्याचे म्हटले आहे. काही युझर्सनी लवकरच टेस्ला भारतात येईल असा दावा यावरून केला आहे.
मस्क यांचे 13 कोटी फॉलोअर्स
मस्क हे ट्विटरवरील सर्वाधिक फॉलोअर असणारे व्यक्ती आहेत. ट्विटरवर मस्क यांचे 13.43 कोटी फॉलोअर्स आहेत. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांना मागे टाकत ते या यादीत गेल्या मार्च महिन्यातच पहिल्या स्थानी आले होते.
ट्विटरचे 45 कोटी सक्रिय युझर्स
गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या अहवालानुसार ट्विटरचे जगभरात दरमहा 45 कोटी सक्रिय युझर्स आहेत. यापैकी सुमारे 30 टक्के युझर्स मस्क यांना फॉलो करतात. एलॉन मस्क यांनी गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरमध्ये ट्विटरची सूत्रे आपल्या हाती घेतली होती. तेव्हा मस्क यांचे 11 कोटी फॉलोअर्स होते. केवळ पाच महिन्यांतच ही संख्या 13.30 कोटीवर पोहोचली.
ही बातमीही वाचा...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.