आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मस्क यांची अमेरिकन राष्ट्राध्यक्षांवर टीका:म्हणाले- जनतेने त्यांना निवडले हा विचार चुकीचा, लोकांना ड्रामा कमी हवा होता म्हणून ट्रम्पऐवजी जिंकले बायडेन

वॉशिंग्टन14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

टेस्लाचे मालक एलन मस्क दररोज आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. यावेळी त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याबद्दल ट्विट केले आहे. लोकांना कमी नाटक हवे होते म्हणून बायडेन यांची अध्यक्षपदी निवड झाली, असे म्हणत त्यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची खिल्ली उडवली.

मस्क म्हणाले - अमेरिकेला बदलण्यासाठी बायडेन यांची निवड करण्यात आली असे समजणे चुकीचे आहे. लोकांना कमी नाटक हवे होते म्हणून त्यांनी ट्रम्प यांच्यावर विजय मिळवला.

तत्पूर्वी, मस्क यांनी 2024 साली अमेरिकेत होणाऱ्या निवडणुकीबाबतही ट्विट केले होते. 2024 च्या निवडणुकीत कमी फूट पाडणारा उमेदवार चांगला असेल, असे ते म्हणाले.

ट्रम्प यांच्याबाबत ट्विटरचा निर्णय चुकीचा आहे
येथे मस्क यांनी ट्रम्प यांचे ट्विटर हँडल ब्लॉक करणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले- मला वाटते ट्रम्प यांचे ट्विटर अकाऊंट पुन्हा सुरू केले पाहिजे. अलीकडेच एलन मस्क यांनी ट्रम्प यांच्या ट्विटर अकाउंटवर बंदी घालण्याच्या निर्णयाला चूक म्हटले आहे. याशिवाय त्यांनी ट्विटर डील पूर्ण झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या अकाउंटवरील बंदी हटवणार असल्याचे सांगितले होते.

अमेरिकन संसदेत हिंसाचारानंतर ट्रम्पवर बॅन

अमेरिकेत गेल्या वर्षी झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीदरम्यान हिंसाचाराच्या घटना घडल्या होत्या. यासाठी ट्रम्प समर्थकांना जबाबदार धरण्यात आले. यानंतर ट्विटरसह अनेक कंपन्यांनी ट्रम्प यांच्यावर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातली. मात्र, एलन मस्क यांनी ट्विटर विकत घेतल्यानंतर अमेरिकेतील रिपब्लिकन पक्ष ट्रम्प यांच्या खात्यावरून बंदी हटवण्याची मागणी करत आहे.

ट्विटरने यामुळे बंद केले ट्रम्प यांचे खाते
गेल्या वर्षी अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर ट्रम्प यांनी दोन ट्विट केले होते. एकात, त्यांनी हिंसाचाराच्या समर्थकांना क्रांतिकारक म्हणून वर्णन केले, तर दुसर्‍यामध्ये त्यांनी सांगितले की ते 20 जानेवारी रोजी राष्ट्रपती पदाच्या उद्घाटनाला (बायडेन यांच्या शपथविधीला) जाणार नाहीत. या दोन ट्विटनंतर काही मिनिटांत ट्रम्प यांच्या अकाऊंटचे ट्विट दिसणे बंद झाले आणि अकाऊंट सस्पेंडचा संदेश दिसू लागला.

बातम्या आणखी आहेत...