आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एलन मस्क यांच्या संघर्षाची कहाणी:एका बेडरूमच्या अपार्टमेंटमध्ये जमिनीवर झोपले, बालपण सुखी नव्हते, वडील 25 वर्षांपासून दिवाळखोर

वॉशिंग्टन25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ट्विटर, स्पेसएक्स आणि टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी त्यांच्या भूतकाळाबद्दल उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. अनेकांनी दावा केला की मस्क यांचे वडील दक्षिण आफ्रिकेतील पाचूच्या खाणीचे मालक होते. याला उत्तर देताना मस्क यांनी ट्विटमध्ये लिहिले की, ही 'पाचूची खाण' कधी अस्तित्वात असल्याचा कोणताही पुरावा नाही. मस्क यांनी असेही सांगितले की, त्यांचे बालपण कधीही आनंदी नव्हते.

याआधीही एलन मस्क यांनी ट्विट केले होते की, जो कोणी त्यांना खाणीच्या अस्तित्वाचा पुरावा देईल, त्याला 10 लाख डॉजकॉइन्स देतील. एलन मस्क यांची आई माये मस्क यांनी ट्विटरवर लोकांना विचारले की जर अशी खाण अस्तित्त्वात असेल तर त्यांना आणि एलन मस्क यांना लहानपणी एका बेडरूमच्या अपार्टमेंटमध्ये जमिनीवर का झोपावे लागले?

मस्क सध्या जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत उद्योगपती आहेत. त्यांची एकूण संपत्ती 178.2 अब्ज डॉलर्स म्हणजेच 14.5 लाख कोटी रुपयांच्या जवळपास आहे.

मस्क यांचा जन्म दक्षिण आफ्रिकेत झाला

28 जून 1971 रोजी दक्षिण आफ्रिकेत जन्मलेले एलन मस्क प्रिटोरियामध्ये मोठे झाले. त्यांची आई कॅनेडात जन्मलेल्या दक्षिण-आफ्रिकन मॉडेल आहेत. ज्या 1969च्या मिस दक्षिण आफ्रिका स्पर्धेत अंतिम फेरीत होत्या. त्यांचे वडील एरोल मस्क हे अभियंता आहेत. 1980 मध्ये त्यांचे पालक वेगळे झाले.

मस्क आपल्या भावंडांसोबत मोठे झाले. मस्क (मागे उभा असलेले) त्यांची आई मेयसोबत. आईच्या शेजारी बसलेला भाऊ किंबल आणि बहीण तोस्का आईच्या मांडीवर.
मस्क आपल्या भावंडांसोबत मोठे झाले. मस्क (मागे उभा असलेले) त्यांची आई मेयसोबत. आईच्या शेजारी बसलेला भाऊ किंबल आणि बहीण तोस्का आईच्या मांडीवर.

पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातून भौतिकशास्त्रात पदवी
मस्क यांनी 1995 मध्ये पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातून फीजिक्स आणि बिझनेसमध्ये पदवी प्राप्त केली. ते स्टॅनफोर्ड विद्यापीठातील फीजिक्स पीएचडी प्रोग्राममधून बाहेर पडले. मस्क यांनी 2000 मध्ये कॅनेडियन लेखक जस्टिन विल्सनशी लग्न केले. दोघे 2008 पर्यंत एकत्र राहिले. यानंतर, 2010 मध्ये मस्क यांनी इंग्लिश अभिनेत्री तालुलाह रिलेशी लग्न केले, जे 2016 पर्यंत टिकले. मस्क यांना विल्सनकडून सहा आणि माजी मैत्रीण सिंगर ग्रिम्सपासून दोन मुले आहेत.

मस्क 1989 मध्ये कॅनडाला गेले. 1995 मध्ये पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातून पदवी प्राप्त करण्यापूर्वी त्यांनी दोन वर्षे ओंटारियो येथील क्वीन्स विद्यापीठात शिक्षण घेतले.
मस्क 1989 मध्ये कॅनडाला गेले. 1995 मध्ये पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातून पदवी प्राप्त करण्यापूर्वी त्यांनी दोन वर्षे ओंटारियो येथील क्वीन्स विद्यापीठात शिक्षण घेतले.

वयाच्या 12व्या वर्षी व्हिडिओ गेम बनवले आणि विकले
मस्क हे वयाच्या 10व्या वर्षी संगणक प्रोग्रामिंग शिकले आणि वयाच्या 12व्या वर्षी 'ब्लास्टर' नावाचा व्हिडिओ गेम तयार केला. एका स्थानिक मासिकाने त्यांच्याकडून 500 डॉलरला तो विकत घेतला. ही मस्क यांची पहिली 'बिझनेस अचिव्हमेंट' म्हणता येईल.

1995 मध्ये त्यांनी Zip-2 ही वेब सॉफ्टवेअर कंपनी तयार केली. कॉम्पॅकने 1999 मध्ये 307 दशलक्ष डॉलर्समध्ये कंपनी विकत घेतली. या करारातून मस्क यांना कंपनीतील 7% स्टेकच्या बदल्यात 22 मिलियन डॉलर्स मिळाले. इथूनच एलन मस्क यांचा बिझनेस खऱ्या अर्थाने सुरू झाला.

ebay ने paypal विकत घेतले
मस्क यांनी 1999 मध्ये पेपल तयार केले. eBay ने ते 2002 मध्ये 1.5 बिलियन डॉलरमध्ये विकत घेतले. या करारातून मस्क यांना 180 मिलियन डॉलर कमावले. त्यानंतर लगेचच मस्क यांनी SpaceX ची स्थापना केली. या कंपनीच्या माध्यमातून मस्क यांना मंगळावर वसाहत स्थापन करून मानवतेला मल्टी प्लॅनेट स्पेसीज बनवायचे आहे.

टेस्ला दिवाळखोरीच्या मार्गावर होती, मस्क यांनी सावरली

​​​​​​​2004 मध्ये मस्क यांनी इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाची स्थापना केली. 2008 मध्ये एक काळ असाही होता जेव्हा टेस्ला दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचली होती. तथापि, मस्क यांनी कंपनीला या वाईट टप्प्यातून बाहेर काढले आणि आज ती एक अतिशय यशस्वी कंपनी आहे. या कंपन्यांशिवाय मस्क यांच्याकडे न्यूरालिंक, द बोरिंग कंपनी आणि स्टारलिंक या कंपन्यांचीही मालकी आहेत.

मस्क कोणकोणत्या कंपन्यांचे मालक?

एलन मस्क यांच्याकडे इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्ला आणि स्पेस कंपनी स्पेसएक्स व्यतिरिक्त अनेक कंपन्या आहेत. मस्क यांची न्यूरालिंक, द बोरिंग कंपनी आणि स्टारलिंकमध्येही स्टेक आहेत. एलन मस्क यांची ह्युमन कॉम्प्युटर इंटरफेस कंपनी न्यूरालिंक अनेक दिवसांपासून अशा योजनेवर काम करत आहे, ज्याच्या मदतीने लोकांच्या मेंदूमध्ये न्यूरल चिप बसवता येईल.

या चीपच्या साहाय्याने कोणतीही व्यक्ती कोणतीही हालचाल न करता फक्त विचार करूनच कोणतेही यंत्र नियंत्रित करू शकेल. याद्वारे मस्क यांना अर्धांगवायू, श्रवणशक्ती, अंधत्व यासारख्या समस्या सोडवायच्या आहेत.

मस्क यांनी 17 डिसेंबर 2016 रोजी द बोरिंग कंपनी तयार केली. ही कंपनी ट्रॅफिक जाम, पाऊस आणि वादळ यांचा सामना करण्यासाठी बोगदे बांधण्याचे काम करते. बोरिंग कंपनी येत्या काही वर्षांत शहरी वाहतुकीसाठी हाय-स्पीड हायपरलूप तयार करत आहे.

हायपरलूपच्या मदतीने एका शहरातून दुसऱ्या शहराचा प्रवास कोणत्याही त्रासाशिवाय वेगाने करता येतो. त्याच वेळी मस्क यांची दुसरी कंपनी स्टारलिंक सॅटेलाइट कम्युनिकेशन म्हणजेच सॅटकॉम हायस्पीड इंटरनेट पुरवते. ही इंटरनेट सेवा उपग्रहावरून थेट तुमच्या घरापर्यंत पोहोचते.