आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराट्विटर, टेस्ला आणि स्पेसएक्सचे मालक एलन मस्क हे सतत चर्चेत असतात, आता पुन्हा एकदा मस्क यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. मस्क हळूहळू राजकारणात रस दाखवत असल्याचे दिसून येत आहे. नुकतेच त्यांनी आपण राजकारणात रहावे की यापासून दूर जावे, याबाबत ट्विटरवर एका पोलद्वारे युजर्संचे मत घेतले.
एलन मस्क यांनी Kevin McCarthy यांच्या समर्थनार्थ एक ट्विट केले आणि ते ट्विट चर्चेचा विषय बनले. राजकीय नेत्यावर ट्विट केल्याने मस्क यांना टीकेला सामोरे जावे लागले. यानंतर मस्क यांनी एक पोल घेतला. यात त्यांनी राजकारणापासून लांब राहावे की स्वतःचे नुकसान करत राहावे, असा प्रश्न युजर्संना केला. त्यावर बहुतांश यूजर्सने मस्क यांनी स्वतःच स्वतःचे नुकसान करून घ्यावे, याला जास्त मत दिले.
यानंतर मस्क यांनी पुन्हा आपले 2013 चे एक ट्विट शेअर केले. या ट्विटमध्ये त्यांनी राजकीय गोष्टींवर भाष्य करणार नसल्याचे म्हटले होते. मात्र, हे ट्विट पुन्हा शेअर करत काही सवयी मोडणे कठीण आहे, असे ते म्हणाले.
एलोन मस्क यांनी ट्विटर ही सोशल मीडिया कंपनी विकत घेतल्यापासून काहीना काही गोंधळ सुरूच आहे. नोकर कपात, तसेच कर्मचाऱ्यांचा पगारात कपात अशा अनेक गोष्टींमुळे ट्वीटरचे नवे मालक चर्चेत आले. यापुर्वी त्यांनी असाच एक पोल घेतला होता. ज्यामध्ये ‘मी ट्विटरच्या प्रमुखपदाचा राजीनामा देऊ का?’ असा प्रश्न विचारला होता. तसेच ट्विटर वापरकर्ते जो कौल देतील त्याप्रमाणे मी निर्णय घेईन, असेही मस्क म्हणाले होते. यात बहुमत एलन मस्क यांनी राजीनामा द्यावा, यावर आले होते. पण, या पोलनंतर देखील मस्क हे आपल्या पदावर कायम आहेत.
एलन मस्क राष्ट्राध्यक्ष होतील
रशियाचे माजी अध्यक्ष दिमित्री मेदवेदेव हे रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे कट्टर निष्ठावंत मानले जातात. दिमित्री मेदवेदेव यांनी जर्मनी-फ्रान्समधील युद्ध आणि पुढील वर्षी युनायटेड स्टेट्समध्ये गृहयुद्धाची भविष्यवाणी केली. यासोबतच एलन मस्क हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. येथे वाचा संपुर्ण बातमी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.