आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मस्कच्या एक्स गर्लफ्रेंडचे ट्विटर अकाऊंट गायब:एलन ट्विटरचे मालक होताच अभिनेत्री अंबर हर्डचे ट्विटर बंद; चर्चांना उधाण

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले एलन मस्क यांनी काही दिवसांपूर्वीच ट्विटरचा ताबा घेतला. त्यानंतर त्यांनी कंपनीत नवीन नियमावली लावत कंपनीत फेरबदलाचा धडाकाच लावला. त्यामुळे मस्क गेल्या काही दिवसांपासून सद्या सर्वाधिक चर्चेत आहे. एकीकडे ही बाब असतानांच मस्क संदर्भात आणखी एक इंटरेस्टींग वार्ता समोर आली आहे.

हॉलिवूड चित्रपटातील अभिनेत्री तथा उद्योगपती एलन मस्क यांची एक्स गर्लफ्रेड अंबर हर्डचे ट्विटर खाते अचानक गायब झाले आहे. ट्विटरवर त्यांचे खात्येच दिसत नसल्याने चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे मस्क यांच्या एक्स गर्लफ्रेंडचेच खाते गायब झाल्याने यामागे नेमका हात कुणाचा, अशी चर्चा होऊ लागली आहे. अर्थात, मस्क यांनी ट्विटरचा ताबा घेताच असा प्रकार का घडला असावा, असा प्रश्नही नेटकऱ्यांकडून विचारला जाऊ लागला आहे. खाते बंद होण्याचे कारण काहीही असो, मात्र, मस्क आणि अभिनेत्री अंबर हर्ड यांच्या प्रेमकहानीची यानिमित्ताने चर्चा होऊ लागली आहे.

2016 मध्ये डेटिंग, 2018 झाले वेगळे

एलन मस्क आणि अंबर हर्ड यांनी 2016 मध्ये डेटिंग करण्यास सुरूवात केली होती. साधारण वर्षभर त्यांची प्रेम कहानी कोणालाही कळू शकले नाही. त्यानंतर त्यांची प्रेमकहानी जगासमोर आली होती. मात्र, मित्र-मैत्रिणीचे नाते फार काळ टिकले नाही. 2018 मध्ये ते दोघेही वेगळे झाले होते. दरम्यान, ​​​​​गुरुवारपर्यंत नेटकऱ्यांनी @realAmberHeard या ट्विटर खात्याला सर्च केले असता अभिनेत्रीचे खाते गायबच दिसत होते.

मस्क यांच्या ट्विटर ताब्यात घेताच अनेक घोषणा

ट्विटर ताब्यात घेतल्यानंतर एलन मस्क यांनी अनेक निर्णय लागू केले आहे. नवीन घोषणा देखील केल्या. तर कंपनीतील संचालक मंडळ देखील बरखास्त केले. एकंदरीतच त्यांनी ट्विटर कंपनीवर एकहाती सत्ता काबीज केली आहे. ब्ल्यू टिकसाठी पैसे मोजावे लागतील, ही घोषणा केल्यानंतर नेटकऱ्यांनी मस्क यांच्यावर जोरदार टीका केली होती. मात्र, मस्क म्हणाले की, तुम्हाला पैसे मोजावेच लागतील.

मानहानीच्या खटल्यापासून ब्रेक हवा असेल

दरम्यान, अंबर हर्डचे ट्विटर खाते सापडत नसल्याने नेटकऱ्यांकडून अनेक चर्चा केल्या जात आहे. दरम्यान, अधिकृतपणे यावर कोणीही सांगितलेले नाही. बरेच नेटकऱ्यांनी अंदाज लावला की, तिला माजी पती जॉनली डेपसह तिच्या मानहानीच्या खटल्याच्या प्रतिक्रियेपासून ब्रेक हवा असावा. म्हणूनच ट्विटरवरील खाते बंद केले असेल. परंतु बऱ्याच जणांना आश्चर्य वाटले की, तिचा माजी प्रियकर ट्विटर खात्याचा प्रमुख म्हणून असताना तिचे खाते बंद झालेच कसे? असे सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...