आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Elon Musk's New Announcement, Special Secondary Tags On Profiles Of Leaders And Celebrities On Twitter

एलन मस्क यांची नवी घोषणा:ट्विटरवर नेते आणि सेलिब्रिटींच्या प्रोफाइलवर असणार स्पेशल सेकंडरी टॅग

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

एलन मस्क सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरचे नवीन बॉस झाल्यापासून सातत्याने नवनव्या घोषणा करत आहेत. सीईओ पराग अग्रवाल यांच्यासह अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्याचा विषय असो किंवा ब्लू टिकच्या सबस्क्रिप्शनबद्दल त्यांनी एकामागून एक निर्णयांचा धडाका लावला आहे. आता एलन मस्क यांनी ट्विटरवर राजकारणी आणि सेलिब्रिटींच्या प्रोफाइलवर सेकंडरी टॅग आणण्याबद्दल नवी घोषणा केली आहे.

मस्क ज्या सेकंडरी टॅगबद्दल बोलत आहेत तो टॅग अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्या ट्विटर अकाऊंटवर तुम्हाला पाहता येईल. त्यांच्या नावाखाली एक दुय्यम सेकंडरी टॅग आहे- United States Government Official. मात्र, हा टॅग भारतातील राजकारण्यांना अद्याप देण्यात आलेला नाही.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या खात्यावर सध्या सेकंडरी टॅग आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या खात्यावर सध्या सेकंडरी टॅग आहे.

ट्विटरनुसार, एखाद्या देशाशी संबंधित ट्विटर खात्यांना दुय्यम टॅगद्वारे त्या खात्यांबद्दल अतिरिक्त माहिती मिळेल. हे टॅग सरकारचे काही अधिकृत प्रतिनिधी, राज्य-संलग्न मीडिया संस्था आणि त्या संस्थांशी संबंधित व्यक्तींना दिले जातील. हे लेबल संबंधित ट्विटर खात्याच्या प्रोफाइल पेजवर दिसते. टॅगमध्ये खाती कोणत्या देशाशी संबंधित आहेत आणि ती सरकारी प्रतिनिधी किंवा राज्य-संलग्न माध्यमांद्वारे हाताळली जात आहे की नाही याबद्दल माहिती असते.

सेकंडरी टॅग कोणाला दिला जाईल?

ट्विटरनुसार, देशाच्या त्या वरिष्ठ अधिकारी आणि संस्थांना दुय्यम टॅग दिला जाईल, जे त्या देशाचे अधिकृत आहे. विशेषतः हा टॅग देशाचे राज्य प्रमुख, परराष्ट्र मंत्री, संस्थात्मक प्रमुख, राजदूत, अधिकृत प्रवक्ते, संरक्षण अधिकारी आणि प्रमुख राजनयिक नेत्यांसह प्रमुख सरकारी अधिकारी यांना दिला जाईल.

भारतात सध्या सेकंडरी टॅग सुरू झालेला नाही.
भारतात सध्या सेकंडरी टॅग सुरू झालेला नाही.

त्याचप्रमाणे, त्या माध्यम संस्थांना देश-संबंधित माध्यम मानले जाईल जेथे राज्य आर्थिक संसाधने, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष राजकीय दबावाद्वारे संपादकीय कंटेंट नियंत्रित करतात. राज्य-संलग्न माध्यम संस्थांशी संबंधित खाती, त्यांचे मुख्य संपादक किंवा त्यांचे प्रमुख कर्मचारी यांना सेकंडरी टॅग दिला जाईल. तथापि, संपादकीय स्वातंत्र्य असलेल्या राज्य-अनुदानित माध्यम संस्था, जसे की यूकेमधील बीबीसी किंवा यूएसमधील एनपीआर, राज्य-संलग्न माध्यम म्हणून त्यांना परिभाषित केले जाणार नाहीत.

सध्या कोणत्या देशांमध्ये सेकंडरी टॅग?

सध्या, सेकंडरी टॅग चीन, फ्रान्स, रशिया, यूएसए, यूके, बेलारूस, कॅनडा, जर्मनी, इटली, जपान, क्यूबा, इक्वेडोर, इजिप्त, इंडोनेशिया, इराण, सर्बिया, सौदी अरेबिया, तुर्की, युक्रेन, थायलंडसह सर्व देशांमध्ये जारी करण्यात आला आहे. यामध्ये भारताचा अद्याप समावेश झालेला नाही. मात्र, भविष्यात आणखी देशांचा समावेश करण्यात येईल, असे ट्विटरचे म्हणणे आहे.

ब्लू टिकसाठी महिन्याला मोजावे लागणार 8 डॉलर

एलन मस्क यांनी यापूर्वी सांगितले होते की, ब्लू टिकसाठी वापरकर्त्यांना 8 डॉलर फी म्हणून भरावे लागतील. मात्र, प्रत्येक देशानुसार हे शुल्क वेगवेगळे असतील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. भारतात ट्विटर ब्लू सबस्क्रिप्शनची किंमत किती असेल हे सध्या स्पष्ट नाही. एलन मस्क यांनी सांगितले की ब्लू सबस्क्रिप्शनअंतर्गत लोकांना कोणते फायदे मिळतील.

एलोन मस्क यांच्या मते, या वैशिष्ट्यामुळे स्पॅम आणि घोटाळ्यांना आळा बसेल. ट्विटर ब्लू सबस्क्रिप्शनअंतर्गत युजर्स आता दीर्घ व्हिडिओ आणि ऑडिओ पोस्ट करण्यास सक्षम असतील. ट्विटर ब्लू सदस्यांना सामान्य वापरकर्त्यांच्या तुलनेत निम्म्या जाहिराती पाहायला मिळतील. मस्क यांच्या म्हणण्यानुसार, ट्विटर ब्लू सब्सक्रिप्शनमुळे ट्विटरच्या कमाईत वाढ होईल आणि कंटेंट क्रिएटर्सना रिवॉर्ड्सही मिळतील.

बातम्या आणखी आहेत...