आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायुरोपीयन मेडिसीन एजन्सीने (EMA) सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून कोव्हिशिल्डच्या अधिकृततेसाठी अर्ज प्राप्त झाला नसल्याचे सांगितले आहे. ईएमएने पुढे म्हटले की, युरोपीयन युनियनमध्ये कोरोना लसीच्या वापरासाठी विकसकांना ईएमएकडे एक अर्ज सादर करावा लागतो. परंतु, कोव्हिशिल्ड लसीसाठी सीरमने आतापर्यंत कोणताच अर्ज सादर केले नसल्याचे ईएमएने म्हटले आहे.
युरोपीयन युनियनने गेल्या 15 दिवसांपूर्वी EU डिजिटल कोविड प्रमाणपत्र सादर केले होते. ज्यामुळे संपूर्ण युरोपात प्रवास करता येते. ईएमएने युरोपात प्रवासासाठी आतापर्यंत चार लसींना परवानगी दिली आहे. ज्यामध्ये फायझर/बायोएनटेक, मॉडर्नाचे स्पाइक वॅक्स, अॅस्ट्रॅजेनेका-ऑक्सफोर्ड आणि जॉनसन अँड जॉनसन लसींचा समावेश आहे.
मंजुरी न मिळाल्याने लसीकरणानंतरही केले जात आहे क्वारंटाईन
युरोपात कोव्हिशिल्ड लसीला मंजुरी न मिळाल्याने अनेक प्रवाशांना लस घेतल्यानंतरही क्वारंटाईन राहावे लागत आहे. तर काही देशांमध्ये कोव्हिशिल्ड लस घेतलेल्यांना परवानगीदेखील दिली जात नाहीये. तर दुसरीकडे युरोपातील अनेक देशात याला मंजुरी मिळाली आहे.
EU ने कोव्हिशिल्डला मंजुर केले नाही ग्रीन पास
युरोपीयन युनियनने यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात कोव्हिशिल्ड लसीला ग्रीन पाससाठी मंजुरी दिली नव्हती. कोव्हिशिल्डला युरोपीयन देशात लस विकण्याची परवानगी नसल्याचे ईयूने सांगितले होते. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला होता.
यावर लवकरच तोडगा निघेल - सीईओ सीरम
सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदार पूनावाला गेल्या महिन्यात सांगितले होते की, या मुद्द्याला रेगुलेटर्स आणि डिप्लोमेट्सच्या पातळीवर उपस्थित करीत असल्याने यावर लवकरात लवकर तोडगा निघण्याची आशा वाटते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.