आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Emergency In Sri Lanka Vs President Gotabaya Rajapaksa । Economic Crisis In Sri Lanka Live Update । Jayawardene Sangakkara

श्रीलंकेत आणीबाणी:हजारो विद्यार्थ्यांची मुसळधार पावसात पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने, 3 माजी क्रिकेट कर्णधारही रस्त्यावर, देशात औषधांचा अभूतपूर्व तुटवडा

कोलंबो4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कमालीच्या आर्थिक संकटात सापडलेल्या श्रीलंकेतील राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांच्या सरकारने संसदेतील बहुमत गमावले आहे. लंकन संसदेच्या अधिवेशनाला मंगळवारी सुरूवात झाली. त्यात राजपक्षे कुटूंबाविरोधातील जनतेचा रोष पाहून जवळपास 41 खासदारांनी आघाडीतील आपली नावे मागे घेतली. यामुळे राजपक्षे सरकार अल्पमतात आले आहे. नवे अर्थमंत्री अली साबरी यांनीही अवघ्या 24 तासांत आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी सोमवारी अन्य तीन मंत्र्यांसह शपथ घेतली होती.

दुसरीकडे, मंगळवारी सायंकाळी हजारो विद्यार्थ्यांनी मुसळधार पावसात पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्या येथील निवासस्थानाबाहेर मोर्चा काढला. लंकेच्या माजी क्रिकेटपटूंनीही सरकार विरोधात मोर्चा उघडला आहे. यात सनथ जयसूर्या, रोशन महानामा व मार्व्हन अट्टापट्टू या 3 माजी कर्णधारांचा समावेश आहे. हे तिघेही हाती पोस्टर घेऊन निदर्शकांत मिसळलेत.

देशात सार्वजनिक आरोग्य आणीबाणी जाहीर
श्रीलंकेत आता औषधांचा प्रचंड तुटवडा आहे. यानंतर देशात सार्वजनिक आरोग्य आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. याचा अर्थ राज्याच्या आरोग्य सुविधा आता केवळ आपत्कालीन परिस्थितीला प्राधान्य देणार आहेत. सध्याचे आर्थिक संकट असेच सुरू राहिल्यास औषधांचा तुटवडा अत्यंत गंभीर स्थितीला पोहोचेल असे मानले जात आहे.

राजीनामा देणार नाहीत श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया
श्रीलंकेच्या आर्थिक संकटावर विरोधकांनी राष्ट्रपती गोटाबाया यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यावर गोटाबाया राजपक्षे यांनी आपण श्रीलंकेचे राष्ट्रपतिपद सोडणार नसल्याचे सांगितले. तथापि, संसदेत 113 जागांवर बहुमत सिद्ध करणाऱ्या कोणत्याही पक्षाकडे सत्ता सोपवण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले.

श्रीलंकेतील राजकीय पक्षांमधील परस्पर तणाव कमी होण्याचे नाव घेत नाहीये. विरोधी पक्षांनी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांचे एकत्रित मंत्रिमंडळात सामील होण्याचे आवाहन धुडकावले.

श्रीलंकेतील राजकारणाशी संबंधित इतर मोठे अपडेट्स...

  • श्रीलंकेच्या पोलिसांनी आंदोलकांना कायदा मोडू नका, असा इशारा दिला आहे.
  • सोमवारी आंदोलकांच्या एका गटाने पंतप्रधानांच्या निवासस्थान टेम्पल ट्रीला घेराव घातला. हे लोक देशात आणीबाणी आणि कर्फ्यूला विरोध करत होते.
  • श्रीलंकन सैन्याचे म्हणणे आहे की, ते नेहमी गरजेनुसार राज्याच्या संरक्षणासाठी तयार राहते. संरक्षण दल नेहमीच संविधानाचे पालन करते.
  • श्रीलंकेचे कॅबिनेट मंत्री जॉन्सन फर्नांडो यांनी दावा केला आहे की, राष्ट्रपतींना राजीनामा देण्याची गरज नाही. त्यांना आता जनतेचा पाठिंबा आहे.

श्रीलंकेत सार्वजनिक आरोग्य आणीबाणी

श्रीलंकेत औषधांचा प्रचंड तुटवडा आहे. यानंतर देशात सार्वजनिक आरोग्य आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. याचा अर्थ राज्यातील आरोग्य सुविधा आता केवळ आपत्कालीन रुग्णांना प्राधान्य देणार आहेत. एएनआयने श्रीलंकन ​​वृत्तपत्राच्या हवाल्याने म्हटले आहे की, सध्याचे आर्थिक संकट असेच चालू राहिल्यास औषधांचा तुटवडा अत्यंत गंभीर स्थितीला पोहोचेल.

जयवर्धने-संगकारा यांचा सरकारवर हल्लाबोल

दुसरीकडे, अनुभवी फलंदाज महेला जयवर्धने आणि कुमार संगकारा यांनी सोशल मीडियावर सरकारविरोधात संताप व्यक्त केला आहे. जयवर्धने यांनी लिहिले - सरकार सामान्य लोकांच्या गरजांकडे दुर्लक्ष करू शकत नाही. सरकारला विरोध करणाऱ्या लोकांना अटक करणे हे खपवून घेतले जाणार नाही. खरे नेते चुका स्वीकारत असतात.

त्याचवेळी संगकाराने सोशल मीडियावरही लिहिले - श्रीलंका सर्वात कठीण काळाचा सामना करत आहे. लोकांचे दु:ख पाहून माझे हृदय तुटते. लोक त्यांना आवश्यक असलेल्या गोष्टी मागत आहेत. ते शत्रू नाहीत.

श्रीलंकेला 7 एप्रिलला मिळणार केंद्रीय बँकेचे नवे गव्हर्नर

श्रीलंकेच्या मध्यवर्ती बँकेचे माजी अधिकारी नंदलाल वीरासिंघे हे 7 एप्रिल रोजी मध्यवर्ती बँकेचे गव्हर्नर म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. अजित निवार्ड काब्राल यांनी सोमवारी गंभीर आर्थिक संकटात गव्हर्नर पदाचा राजीनामा दिला होता.

आणीबाणीच्या काळात श्रीलंकेतील संपूर्ण मंत्रिमंडळाने रविवारी रात्री राजीनामा दिला.
आणीबाणीच्या काळात श्रीलंकेतील संपूर्ण मंत्रिमंडळाने रविवारी रात्री राजीनामा दिला.

राजपक्षे कुटुंबाविरोधात जनतेचा संताप

आर्थिक संकटात असताना राजपक्षे कुटुंबाविरोधातही लोकांमध्ये रोष वाढत आहे. लोकांनी आपला संताप व्यक्त करत म्हटले आहे की, एका कुटुंबाला या देशाचा नाश करण्यापासून रोखा, आपला देश विकणे बंद करा. दरम्यान, श्रीलंकेत राजपक्षे कुटुंबाकडेच सरकारची सर्व महत्त्वाची पदे आहेत.

15 तासांनंतर सुरू झाले इंटरनेट...

श्रीलंकेतील निदर्शने दडपण्यासाठी सरकारने इंटरनेटवर बंदी घातली. ही सेवा 15 तासांनंतर पुन्हा सुरू झाली. रशियातही इंटरनेट बंद करण्यात आले. या वर्षी जगातील 9 देशांमध्ये 8000 तास इंटरनेट बंद होते. यामुळे 19,500 कोटी रुपयांचे नुकसान झाले.

श्रीलंकेच्या खासदाराने केले भारताचे कौतुक

श्रीलंकेचे खासदार सागरा करियावासम यांनी सोमवारी सर्वपक्षीय बैठकीनंतर प्रसारमाध्यमांना सांगितले - भारत आमचा शेजारी आहे आणि त्याने आम्हाला नेहमीच मदत केली आहे. यावेळीही आपण अत्यंत कठीण परिस्थितीतून जात आहोत, तेव्हा भारत सरकार आपल्या पाठीशी उभे आहे. भारताच्या मदतीने आम्ही या परिस्थितीवर लवकरच मात करू अशी आम्हाला मनापासून आशा आहे.

बातम्या आणखी आहेत...