आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअभूतपूर्व आर्थिक संकटातून वाटचाल करणाऱ्या श्रीलंकेतील राष्ट्रपतींच्या विरोधात निदर्शने सुरू आहेत. परिस्थिती प्रचंड चिघळली आहे. काही ठिकाणी पोलिस व लष्कर यांच्यात धुमश्चक्री पाहायला मिळाली. अनेक भागात निदर्शकांनी सुरक्षा दलावर दगडफेक केली. जमावाला पांगवण्यासाठी सुरक्षा दलाने अश्रुधुराचा मारा केला. त्यातच राष्ट्रपती गाेटबाय राजपक्षे यांनी देशावर लादलेली आणीबाणी हटवली. परंतु औषधींचा तुटवडा असल्याने मेडिकल आणीबाणी घाेषित करण्यात आली.देशात अराजक असताना राष्ट्रपती राजपक्षे यांनी राजीनामा देणार नसल्याचे जाहीर केले. रस्तेमंत्री जाॅन्स्टन फर्नांडाे बुधवारी संसदेत म्हणाले, जबाबदार सरकार या नात्याने राष्ट्रपती राजीनामा देणार नाहीत. कारण ते लोकांनी निवडून दिलेले राष्ट्रपती आहेत. आणीबाणी लागू करणे व ती मागे घेण्याच्या राष्ट्रपती यांच्या निर्णयाचे सरकारने समर्थन केले आहे. कोलंबो गॅझेटनुसार मंत्री दिनेश गुणवर्धने म्हणाले, राष्ट्रपती कार्यालय व इतर सार्वजनिक संपत्तीवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्यानंतर राष्ट्रपती राजवट लागू झाली होती.
बँक व हाॅटेल मालकही रस्त्यावर, कर्मचाऱ्यांचा सहभाग सरकारच्या चुकीच्या धाेरणामुळे बँक व हाॅटेल कर्मचारीदेखील सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरले. बँक आॅफ सिलोनचे अधिकारी म्हणाले, सरकारने चुकीचे निर्णय घेतले. लोकांना त्याचा फटका बसू लागला आहे. अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. हाॅटेल असाेसिएशनने पर्यटन उद्याेगाला वाचवण्यासाठी निदर्शने केली.
आरोग्याची आणीबाणी, भारताने पोहोचवली औषधी
श्रीलंकेत औषधींचा तुटवडा असल्यामुळे आरोग्यविषयक आणीबाणी जाहीर करण्यात आली. भारताने श्रीलंकेला औषधी उपलब्ध करून दिली आहे. नॅशनल हाॅस्पिटलने त्यासाठी भारतास धन्यवाद दिले. कोलंबोमध्ये नॅशनल आय हाॅस्पिटलचे संचालक डाॅ. दममिका म्हणाले, आमच्या बहुतांश औषधी-गाेळ्या भारतातून येत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.