आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिकेत कोरोना महामारीचा पुन्हा एकदा वेगाने फैलाव सुरू झाला आहे. देशात अनेक रुग्णालयांत आणीबाणीसारखी स्थिती दिसून येत आहे. टेक्सास राज्याची राजधानी ऑस्टिनमध्ये परिस्थिती अतिशय गंभीर बनली आहे. आयसीयूमध्ये केवळ सहा खाटा शिल्लक आहेत. शहराची लोकसंख्या २४ लाख आहे. राज्याच्या आरोग्य विभागानुसार रुग्णालयांत ३१३ व्हेंटिलेटर आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक डेसमर वॉक्स यांच्या कार्यालयातून नागरिकांना संकटाचे इशारे देणारे ई-मेल व फोन केले जात आहेत. वॉक्स म्हणाले, लोकांना महामारीच्या कारणांची माहिती कळवली.रुग्णालयांची स्थिती तणावपूर्ण बनली.त्यांच्यावरील ताण कमी करायचा असल्यास लोकांनी सहकार्य करणे गरजेचे आहे.
रुग्णालय : ऑस्टिनची लोकसंख्या २४ लाख, केवळ ६ खाटा शिल्लक
डेल्टामुळे शहरात महिनाभरात नव्या रुग्णांचे दाखल होण्याचे प्रमाण सरासरी ६०० टक्क्यांहून जास्त राहिले आहे. आयसीयूमध्ये रुग्णांचे प्रमाण ५७० टक्के वाढले. आरोग्य विभागानुसार ४ जुलै रोजी व्हेंटिलेटरवर केवळ आठ रुग्ण होते. त्याच दिवशी संसर्गामुळे ही संख्या १०२ झाली होती. ऑस्टिनमध्ये संसर्गाचे प्रमाण १० पटीने वाढण्याची शक्यता आहे. संपूर्ण टेक्सास राज्यात एकूण ४३९ आयसीयू खाटा व ६,९९१ व्हेंटिलेटर आहेत. अमेरिकेतील संसर्गरोगतज्ञ डाॅ. अँथनी फाऊचीनुसार देशात ४० टक्के रुग्ण टेक्सास व फ्लोरिडातील आहेत.
लसीकरण : ब्रॅडलीतील तरुणांच्याभरवशावर डोस घेण्यात अग्रेसर
अरकन्सास राज्यात नागरिकांनी कोरोना लसीकरणाला व्यापक पातळीवर विरोध केला. त्यामुळे येथील अनेक गावांची स्थिती अत्यंत गंभीर आहे. या भागात रिपब्लिकन पार्टीचे समर्थक मोठ्या प्रमाणात आहेत. अरकन्सासमध्ये बहुतांश लोकांनी कुटुंबातील कुणी ना कुणी सदस्य गमावला आहे. परंतु त्याला ब्रॅडली कौंटी अपवाद म्हणायला हवी. किंबहुना देशभरात ब्रॅडली लसीकरण कार्यक्रम राबवण्यात आदर्श ठरली आहे. दहा हजार एवढी ब्रॅडलीची लोकसंख्या आहे. गाव लहान असूनही सर्वांनी त्याचे अनुकरण करावे असे काम लोकांनी करून दाखवले. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये एका निवृत्त शिक्षकाचा विषाणूमुळे मृत्यू झाला होता. सामान्यपणे व्हेंटिलेटरवर जाईपर्यंत लोकांना जाग येत नाही. परंतु शिक्षकाच्या मृत्यूने ब्रॅडलीतील गावकऱ्यांत जागृती आली, असे सरकारचे अधिकारी जेफ वार्डलॉ यांनी सांगितले.
ब्रॅडली कौंटी मेडिकल सेंटरच्या डॉक्टर मिशेल विवर म्हणाल्या, गावात डॉक्टरांची संख्या कमी आहे. परंतु डॉक्टर, आरोग्य कर्मचारी लोकांना जागरूक करण्यासाठी वारंवार भेटत होते. डॉक्टरांनी परस्परांना एसएमएसने समन्वय राखला. सोशल मीडियाची देखील मदत घेण्यात आली. आम्ही तरूणांवर लक्ष केंद्रित केले होते. कारण ते जास्त घराबाहेर जातात. लाकडाच्या कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांची संख्या जास्त आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.