आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Emotional Waves Are Generated In The Brain In Such A Short Time Of One seventh Of A Second, Which Is Why Adults Think Chimpanzees Are Cute. News And Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:एक सेकंदाचा सातवा भाग एवढ्या कमी वेळेत मेंदूत निर्माण होतात भावनांचे तरंग, म्हणूनच प्रौढांना चिमुकली मुले वाटतात क्यूट

लंडनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ऑक्सफर्डच्या संशोधकांनी न्यूरोइमेजिंग तंत्रत्रानाद्वारे क्युटनेस रेटिंग प्रणाली विकसित केली
  • हा भाग सक्रिय होताच क्युटनेस आपल्या मेंदूला हॅक करतो

एखादे लहान मूल पाहिले की त्याला कवटाळावे वाटते. हे असे का घडते? हे मूल क्षणात एवढे क्यूट का वाटते, याचा शोध शास्त्रज्ञांनी लावला आहे. चिमुकल्याचे बोलके डोळे, गोबरे गाल, बटणासारखे नाक, मोहक हास्य आणि मुलायम त्वचा आपल्याला आकर्षित करते, कारण प्रौढांत ऑर्बिटोफ्रॉन्स्टल कॉर्टेक्स (मेंदूत भावनांचे तरंग निर्माण करणारा भाग) खूप लवकर सक्रिय होतो. हा भाग डोळ्यांच्या अगदी मागे असतो आणि मुलाचा चेहरा पाहिल्यानंतर सेकंदाच्या सातव्या भागातच जागृत होतो, त्यामुळे प्रौढ लोक मुलांकडे आकर्षित होतात.

प्रौढांमध्ये ऑर्बिटोफ्रॉन्स्टल कॉर्टेक्स कशा प्रकारे काम करते हे ऑक्सफर्डच्या संशोधकांनी न्यूरोइमेजिंगद्वारे शोधले आहे. विद्यापीठाच्या न्यूरोसायन्स विभागाचे प्राध्यापक मार्टन क्रिंगलबॅक यांनी सांगितले की, आपल्या मेंदूचा हा भाग सक्रिय होताच आपल्या तोंडातून, ‘वा, किती सुंदर मुलगा आहे, त्याला मी माझ्याजवळच ठेवणार,’ असे उद्गार निघतात. कुत्र्याच्या किंवा मांजरीच्या पिलांबाबतही असेच घडते. हा क्युटनेस काही काळासाठी आपला मेंदू हॅक करतो. ही एक न्यूरॉलॉजिकल प्रतिक्रिया आहे. ऑर्बिटोफ्रॉन्स्टल कॉर्टेक्स निर्णय घेण्याची शक्ती देतोच, शिवाय नवी माहितीही शिकवतो.

मानव प्रजाती हजारो वर्षांपासून विकसित होत आहे. काही प्राणी जन्मताच उभे राहतात, माणसाबाबत हे घडत नाही. धीम्या गतीने होणाऱ्या देखभालीमुळेच मेंदूची संरचना व क्षमता वाढते.आम्ही क्युटनेसची मोजणी करण्यासाठी मेंदूच्या स्कॅनिंगचे नवे तंत्रज्ञान विकसित केले. न्यूरोइमेजिंग म्हणजे चुंबकीय क्षेत्रांचा वापर करून मिलिसेकंदांत मेंदूच्या हालचालींचे मॅपिंग केले. कोणता चेहरा तुम्हाला किती क्युट वाटत आहे, हे आता आम्ही सांगू शकतो.

शास्त्रज्ञ म्हणतात, क्युटनेस चांगला माणूस घडविण्यात मदत करतो
प्रा. क्रिंगलबॅक म्हणाले की, क्युटनेस चांगला माणूस होण्यास मदत करते. पालक व मुले यांच्या बंधनात समस्या कशा येतात हे समजून घेण्यात आम्हाला यश मिळाले आहे. उदा. काही मुले नैराश्य घेऊन जन्मतात, काहींचे ओठ फाटलेले असतात. या गोष्टी घडल्याच नाहीत तर मानवी जीवनात देखभालीची असलेली ही भावना कदाचित कमी होईल.
शास्त्रज्ञ म्हणतात, क्युटनेस आपल्यात चांगला माणूस घडवण्यात मदत करते.

बातम्या आणखी आहेत...