आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • End Of Political Crisis Over Pakistan Government; Two More Parties Parted Ways, With Imran Khan Confirmed| Marathi News

गच्छंती नक्की:पाकिस्तान सरकारवरील राजकीय संकट टोकाला; आणखी दोन पक्षांनी साथ सोडली, इम्रान खान यांची गच्छंती निश्चित

पाकिस्तान3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानच्या इम्रान खान सरकारचा पाठिंबा आणखी दोन पक्षांनी काढून घेतल्याने त्यांची गच्छंती नक्की मानली जात आहे. इम्रान बुधवारी सायंकाळी देशाला संबोधित करणार होते. पण लष्करप्रमुख कमर बाजवा व आयएसआय चीफ नदीम अंजुम यांच्या भेटीनंतर हे संबोधनही रद्द करण्यात आले.

इम्रान यांची गच्छंती...यापूर्वी ७ खासदार असलेला पक्ष एमक्यूएम-पीने समर्थन काढून घेतले. ५ खासदार असलेल्या बीएपीनेही समर्थन काढले. आता पीटीआय आघाडीत फक्त १६७ खासदार आहेत. तर विरोधकांकडे १८० आहेत. बहुमतासाठी १७२ पाहिजेत. इम्रानचे मित्र जहांगीर तरीन यांनीही केंद्र व पंजाबातून समर्थन काढले.महागाई, कर्ज आणि गोंधळ : वाढती महंगाई, कर्ज आणि गोंधळामुळे बिथरलेले विरोधक एक झाले. मौलाना फजलूर रहेमानच्या नेतृत्वात एकत्र येत आघाडी केली.आयएसआय प्रमुखाची नियुक्ती : लष्कराच्या अंतर्गत बाबीत दखल देणे इम्रान यांना भोवले. आयएसआय प्रमुखाच्या नियुक्तीमुळे वाद सुरू.लष्करावर नियंत्रण : इम्रान आयएसआयला लष्करी तुकडीचा दर्जा देऊ इच्छित होते.पण स्वत:च अडचणीत आल्याने टीका सुरु केली. भारतीय लष्कराचे कौतुकही केले.चीन, सौदी सर्वांशी नाते तुटले : अमेरिका, चीन आणि सौदी अरबशी असलेले नाते बिघडले.

प्रत्येक आघाडीवर अपयश
लष्कराच्या इशाऱ्यावर चालणारे पीएमएल-क्यू आणि बीएपीने पाठिंबा मागे घेतल्याने स्पष्ट होते की इम्रान यांना लष्कराशी संघर्ष करणे महागात पडले. पंजाबमध्ये इम्रान यांनी मुख्यमंत्री हटवून पीएमएल-क्यूच्या परवेज इलाहींना हे पद दिले. पण तेथील आघाडी नाराज झाली.परिणामी पंजाबमध्ये इम्रानचा पक्ष सरकार वाचवू शकणार नाही.

इम्रान म्हणाले, माझे सरकार पाडण्यासाठी विदेशी षड‌्यंत्र
इम्रान खान म्हणाले, त्यांचे सरकार पाडण्यामागे विदेशी कट आहे. याचा पुरावा ते जनतेसमोर उघड करतील. तर, विरोधी पक्षांनी म्हटले की हे इम्रान यांचे नवे नाटक आहे.

बातम्या आणखी आहेत...