आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऊर्जा संकट:युरोपमध्ये ऊर्जेचे संकट; अनेक देशांत वीज कपात, कोरोनानंतर जगभरात ऊर्जेच्या मागणीत वाढ

15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगभरात ऊर्जेचे मोठे संकट आहे. काही देशांत वीज कपात झाली आहे तर काही देशांमध्ये कोळशाच्या तुटवड्यामुळे वीजपुरवठा ठप्प होणार आहे. कोळसा नाही. नैसर्गिक वायू, इंधनाचे दर आकाशाला भिडले आहेत. युरोपात या वर्षीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत नैसर्गिक गॅसच्या दरात ४०० टक्के तर विजेच्या दरात २५० टक्के वाढ झाली आहे. चीनच्या कारखान्यांत उत्पादनात १८ टक्क्यांनी घट झाली आहे. जगाला ऊर्जेच्या संकटास तोंड का द्यावे लागत आहे? हा खरा प्रश्न आहे. कोरोना काळानंतर परिस्थिती सामान्य होत असताना उत्पादन क्षेत्रात अचानक मागणी वाढली. हे देखील त्यामागील मोठे कारण सांगितले जाते. आगामी काळात जगभरात विजेचे संकट आणखी वाढेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

अनेक देशांत उत्पादनात घट, रोजगारावर संकट
चीन
: अनेक प्रांताला विजेच्या संकटाचा फटका बसला आहे. या प्रांतात अनेक तासांची वीज कपात केली जात आहे. कोळशाच्या उत्खननाचे काम ६५ टक्के कमी करण्यात आले आहे. कारखाने बंद बडले आहेत.

अमेरिका : शुक्रवारी एक गॅलन गॅलोलिनची किंमत ३.२५ डॉलरवर पोहोचली आहे. एप्रिलमध्ये ही किंमत १.२७ प्रति गॅलन होती. युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाचे प्रो. स्टीव्हन डेव्हिस यांच्या म्हणण्यानुसार हिवाळ्यात इंधनाची विक्री १ टक्के वाढू शकते.

दक्षिण आशिया :सप्टेंबरनंतर आर्थिक आधार असलेल्या देशांत नैसर्गिक इंधनाच्या दरात ८५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या १३ वर्षांत पहिल्यांदाच दरात एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

लेबनॉन : वीज नसल्यामुळे देशात काळोख पसरला आहे. अल जहरानी व दीर अम्मार हे दोन मोठे वीज केंद्र आहेत. वीज केंद्रांवरील वीज उत्पादन २०० मेगावॅटने घसरले आहे.

ब्रिटन : ट्रकचालकांच्या कमतरतेमुळे आतापर्यंत गॅस स्टेशनवर पुरवठा सुरळीत झालेला नाही. गॅसचे दरही गेल्या एका दशकादरम्यान सर्वाधिक आहे. त्यामुळे देशात दबाव वाढेल.

ऊर्जा संकटाचा परिणाम
जगभरातील लोकांसाठी थंडीचे दिवस कठीण जाऊ शकतात. थंडी असलेल्या देशांत घरे व इतर ठिकाणांना उष्ण ठे‌वण्यासाठी इंधनचा जास्त वापर केला जातो. परंतु नजीकच्या काळात विजेची पूर्तता टप्प्यात दिसत नाही. म्हणूनच थंडीत सामान्यांचे हाल होऊ शकतात. उत्पादनाच्या क्षमतेवर देखील विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्पादन, वितरण, विक्रीवरही परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणाम अनेक देशांत नागरिकांत असंतोष वाढूही शकतो.

पुढे काय ? वाढती महागाई रोखण्याचे मोठे आव्हान
- ऊर्जा पुरवठा आणखी काही काळ ठप्प राहू शकतो. किमतीवर नियंत्रण हे सर्वात मोठे आव्हान ठरू शकते.उत्पादकांना उत्पादन वाढवण्यासाठी वेळ द्यावा लागतो.
- हवामान बदलावर ३१ ऑक्टोबरला ग्लासगोमध्ये जगभरातील विविध देशांची कॉप-२६ बैठक होणार आहे. त्यात या मुद्द्यांवर निर्णय होणार आहे.

अर्थव्यवस्था खुल्या होऊ लागल्या..
ऊर्जेची जास्त मागणी होत असल्याने हे संकट वाढले आहे. कोरोना काळानंतर बहुतांश देशातील कारखाने पुन्हा सुरू होत आहेत. त्यामुळे ऊर्जेचा वापर वाढला. वाढत्या मागणीमुळे साठवणुकीच्या प्रक्रियेला विस्कळीत केले.

बातम्या आणखी आहेत...