आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर आता ब्रिटनच्या चलनावर राजा चार्ल्सचा फोटो छापला जाणार आहे. ब्रिटनच्या मध्यवर्ती बँकेने मंगळवारी इंग्लंडच्या चलनी नोटांचे डिझाईन नव्या रूपात जारी केले. या नोटांवर राजा चार्ल्सचे चित्र छापलेले आहे.
बीबीसीच्या वृत्तानुसार, बँक ऑफ इंग्लंडने जारी केलेल्या चलनी नोटेवरील चित्रांऐवजी राजा चार्ल्सचे चित्र घेतले जाणार आहे. बाकी सर्व जसेच्या तसे राहील.
राजघराण्याची मागणी जास्त नोटा छापू नका
सप्टेंबरमध्ये त्यांच्या मातोश्री राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर चार्ल्स राजे झाले. बँकेने राजा चार्ल्स यांचे फोटो असलेल्या नोटा छापण्यापूर्वी राजघराण्याशी सल्लामसलत केली होती. राजघराण्याचं म्हणणं आहे की, राजा चार्ल्स यांचे फोटो असलेल्या नोटा फक्त फाटलेल्या नोटा बदलण्यासाठी आणि बाजारातील चलनाची मागणी पूर्ण करण्यासाठी छापल्या जाव्यात. जेणेकरून जास्त खर्च होणार नाही आणि पर्यावरणाची हानी कमी होईल.
जुन्या नोटांची मान्यता जाणार नाही
किंग चार्ल्स यांचे फोटो 5, 10, 20 आणि 50 पाउंडांच्या नोटांवर दिसतील. ज्याचे सर्क्युलेशन 2024 पासून सुरू होणार आहे. राणी एलिझाबेथचा फोटो असलेल्या चलनी नोटांच्या वैधतेवर याचा परिणाम होणार नाही, असे बँक ऑफ इंग्लंडने म्हटले आहे. यूकेमध्ये त्यांचा वापर सुरू राहील.
नोटांवर छापणार 10 वर्षे जुना फोटो
एएफपी या वृत्तसंस्थेनुसार, नवीन नोटांवर राजा चार्ल्स यांचा 10 वर्षे जुना फोटो छापण्यात येणार आहे. हा फोटो राजघराण्याने 2013 मध्ये सार्वजनिक केला होता. अलीकडच्या काही महिन्यांत अंतिम रूप देण्यात आलेल्या नवीन डिझाइनला राजा चार्ल्स यांनी मान्यता दिली आहे. 2023च्या पहिल्या सहामाहीपासून या नोटा मोठ्या प्रमाणावर छापल्या जातील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.