आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रगीतावेळी इराणी खेळाडू मौन:महिला विरोधी कठोर इस्लामिक ड्रेस कोड विरोधात फुटबॉलचा राष्ट्रीय संघ

दोहा13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कतारमध्ये सुरू असणाऱ्या फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये सोमवारी सायंकाळी इराणच्या टीमने अनोखे विरोध प्रदर्शन केले. संघाचे सर्वच खेळाडू राष्ट्रगीत सुरू असताना मौन उभे राहिले. याऊलट इंग्लिश खेळाडूंनी मोठ्या अभिमानाने आपले राष्ट्रगीत म्हटले.

इंग्लंड-इराणच्या सामन्यापूर्वी वाजवण्यात येणाऱ्या दोन्ही देशांच्या राष्ट्रगीतावेळी ही घटना पहावयास मिळाली.

इराणमध्ये सध्या हिजाब विरोधी आंदोलन सुरू आहे. तिथे शेकडो महिला या प्रकरणी रस्त्यावर उतरल्यात. त्यांची कट्टरपंथी सरकारकडून मुस्कटदाबी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर इराणी खेळाडूंनी आपल्या महिलांना ठाम पाठिंबा दर्शवत कठोर इस्लामिक ड्रेस कोडविरोधात निषेध नोंदवला आहे.

चाहत्यांकडून खेळाडूंचे समर्थन.
चाहत्यांकडून खेळाडूंचे समर्थन.

निदर्शने का...?

इराणमध्ये महिलांसाठी इस्लामिक ड्रेस कोड अत्यंत कठोर आहे. इराणच्या कायद्यानुसार, महिलांना घराबाहेर पडताना डोके हिजाब किंवा स्कार्फने झाकणे आवश्यक आहे. या नियमाचे उल्लंघन केल्यास त्यांना कठोर शिक्षेला सामोरे जावे लागते.

FIFAचे व्यासपीठ का निवडले?

इराण सरकार हे आंदोलन दाबून टाकण्याचा प्रयत्न करत आहे. शेकडो जणांना अटक केली आहे. तसेच अनेकांचा मृत्यूही झाला आहे. यामुळेच संघाने फुटबॉल वर्ल्डकपच्या व्यासपीठावरून आपल्या सरकार विरोधात निदर्शने केले.

एवढा गोंधळ का?

इराणमध्ये महसा अमिनीच्या मृत्यूनंतर गदारोळ सुरू झाला. 22 वर्षीय अमिनीला 13 सप्टेंबर रोजी मोरेलिटी पोलिसांनी अटक केली होती. तिच्यावर हिजाबच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप होता. त्यानंतर तिचा कोठडीत अचानक मृत्यू झाला.

फ्रेंडली मॅचमध्ये देशाचे सिंबल काळ्या जॅकेटने झाकले

इराणच्या खेळाडूंनी यापूर्वीही हिजाब विरोधी आंदोलनाचे समर्थन केले आहे. एका मैत्री सामन्यात खेळाडूंनी देशाचे सिंबल अर्थात प्रतीक काळ्या जॅकेटने झाकून आपला विरोध नोंदवला होता. तर काहींनी गोल केल्यानंतर आनंदोत्सव साजरा केला नव्हता. फुटबॉलसह अन्य क्रीडा प्रकारातील खेळाडूंनीही राष्ट्रगीत म्हणण्यास नकार दिला होता.

संघाने देशाचे प्रतीक काळ्या जॅकेटने झाकले होते.
संघाने देशाचे प्रतीक काळ्या जॅकेटने झाकले होते.
बातम्या आणखी आहेत...