आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकशाहीवर वार:हाँगकाँगच्या बाहेरील इंग्लिश शिक्षकांना शहराबद्दल निष्ठेसाठी शपथ अनिवार्य

हाँगकाँग19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चीनच्या हाँगकाँग शहरातील सरकारी शाळांत परदेशातील इंग्लिश शिक्षकांना शहराबद्दलची निष्ठा सिद्ध करावी लागणार आहे. त्यासाठी शपथ घ्यावी लागणार आहे. हाँगकाँगच्या शिक्षण विभागाने एनईटीचे (नेटिव्ह इंग्लिश स्पीकिंग टीचर्स) शिक्षकांना २१ जूनपर्यंत आपले शपथपत्र दाखल करावे लागणार आहे. त्यानंतरच त्यांना अध्यापनाचे काम सुरू ठेवता येऊ शकेल. हाँगकाँगविषयी निष्ठा ठेवली जाईल, असे या परदेशी इंग्लिश शिक्षकांना शपथेवर सांगावे लागेल. या शपथपत्रावर स्वाक्षरी करावी लागेल. सामान्य कायदे, शहराच्या संविधानासोबतच सरकारविषयी जबाबदारीचे पालन केले जाईल, असे त्यात नमूद केले आहे. १९९८ मध्ये एनईटीचा कायदा लागू झाला. त्यात सरकारी तसेच सरकारी अनुदान असलेल्या प्राथमिक-माध्यमिक शाळांत परदेशी शिक्षकांची नियुक्तीची परवानगी देण्यात आली होती. २०२० पासून हाँगकाँगमध्ये नोकऱ्यांत वाढ झाली. हे लक्षात घेऊन सरकारने अशा प्रकारचे शपथपत्र लागू केले.

तियानमेनची पुनरावृत्ती टाळण्यासाठी खटाटोप
इंग्लिश शिकल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये लोकशाहीचे बिजे वाढू लागतात. त्यातून तियानमेनसारखे आंदोलन पुन्हा होऊ नये, असे हाँगकाँग सरकारला वाटते. त्याशिवाय कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी हाँगकाँगने कडक रणनीती अवलंबली आहे. त्यामुळे वैतागलेल्या परदेशी इंग्लिश शिक्षकांनी काम सोडण्यास सुरुवात केली आहे.

बातम्या आणखी आहेत...