आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संसर्गाचा परिणाम:महामारीचा वृद्धांच्या आरोग्यावर वाईट परिणाम; अमेरिका, कॅनडातील अभ्यासाचा निष्कर्ष

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काेविड-१९ महामारीमुळे बदललेल्या दिनचर्येचा परिणाम वृद्धांना अनेक पातळीवर हानी पाेहाेचवणारा ठरला आहे. त्यांच्या शारीरिक स्थितीमध्ये घसरण दिसू लागली आहे. त्यांच्या हालचाली कमी झाल्या. संसर्गाचा किरकाेळ परिणाम झालेले किंवा विषाणूपासून बचावलेल्यांना देखील अनेक प्रकारचे त्रास दिसून आले आहेत, असा दावा नव्या संशाेधनातून करण्यात आला. विषाणू संसर्गाने गंभीर आजारी असलेल्या वृद्धांना शारीरिक व मानसिक त्रासातून जावे लागते. अमेरिका व कॅनडात एक अभ्यास प्रकल्प राबवण्यात आला. त्यानुसार ६५ वर्षांहून जास्त वयाचे ४० ते ५० टक्के लाेक म्हणाले, मार्च २०२० नंतर महामारी पसरल्यानंतर त्यांच्या सक्रियतेत घट झाली. ते पूर्वीच्या तुलनेत कमी प्रमाणात हालचाली करतात. कॅनडातील एका अभ्यासाचा देखील हा निष्कर्ष आहे. आतापर्यंत महामारीचा परिणाम ज्येष्ठ नागरिकांच्या मृत्यू दरावर केंद्रित हाेता. अमेरिकेत मृत्युमुखी पडलेल्यांपैकी ७५ टक्के लाेकांचे वय ६५ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त आहे. मेकमास्टर विद्यापीठ, आेंटारियाे येथील वृद्ध व दुर्धर आजारांच्या संशाेधक मार्ला ब्यूचॅम्प म्हणाल्या, अनेक महिन्यांनंतरही काेविडचा लाेकांवर परिणाम दिसून येत आहे. डाॅ. ब्यूचॅम्प यांच्या नेतृत्वाखाली कॅनडात ५० वर्षांवरील लाेकांच्या स्थितीचे अध्ययन करण्यात आले. त्यापैकी ९३ टक्के लाेकांना कधीही रुग्णालयात दाखल करावे लागले नव्हते.महामारीच्या आधीचा विचार केल्यास त्या तुलनेत आता चालणे-फिरणे, व्यायाम या गाेष्टी कमी झाल्या आहेत.

शारीरिक हालचाली घटल्यास अनेक व्याधी
महामारीच्या काळात बाजार, जिम, थिएटर, धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आली हाेती. त्यामुळे अनेक वृद्धांना फिरणे, प्रवास बंद करावा लागला. बहुतेक लाेक धार्मिक तसेच काैटुंबिक कार्यक्रमात देखील सहभागी हाेत नव्हते. मिशिगन विद्यापीठातील डाॅ. जाॅफ्रे हाॅफमॅन म्हणाले, सक्रियता कमी झाल्यास अनेक समस्या निर्माण हाेतात. सहा ते नऊ महिन्यांपर्यंत सक्रियता कमी झाल्यास त्याचा शारीरिक संतुलनावर परिणाम दिसून येताे. मांसपेशींची शक्ती घटते.

बातम्या आणखी आहेत...