आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोनामुळे अमेरिकेसह जगभरातील कोट्यवधी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम झाला आहे. परंतु, एका नवीन अहवालाने अमेरिकन विद्यार्थ्यांसाठी आशेचा किरण जागवला आहे. तेथे गेल्या शैक्षणिक वर्षाच्या अखेरीस अनेक विद्यार्थ्यांनी महामारीनंतर प्रथमच प्रगतीची सामान्य स्थिती प्राप्त केली होती. तरीही प्रगतीचा हा वेग महामारीतील मोठ्या नुकसानीच्या तुलनेत पुरेसा नाही.
शाळांना शैक्षणिक मूल्यांकन प्रदान करणाऱ्या एनडब्ल्यूईए या स्वयंसेवी संस्थेच्या अहवालानुसार, या गतीने प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना सामान्य स्थितीत (महामारीपूर्वीची) परत येण्यास तीन वर्षे लागतील. त्याची भरपाई करण्यासाठी माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना पाच वर्षे किंवा त्याहून अधिक वर्षे लागतील. संशोधकांनी २५,००० शाळांमधील ८० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचे गणित आणि वाचन तपासले. राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या सरकारने महामारीच्या नुकसानीतून सावरण्यासाठी अमेरिकन शाळांसाठी १५ लाख कोटी रुपये मंजूर केले आहेत. यापूर्वी कधीही एवढी रक्कम एकाच वेळी मंजूर झाली नव्हती. ताज्या अंदाजानुसार पैसे संपल्यानंतरही अनेक विद्यार्थ्यांना दीर्घकाळ शिक्षणासाठी मदतीची आवश्यकता असेल.
कृष्णवर्णीय, हिस्पॅनिक आणि मूळ अमेरिकन विद्यार्थ्यांसह अल्प उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर सुधारण्यासाठी बराच वेळ लागू शकतो. या वर्गातील लोकांना महामारीचा सर्वाधिक फटका बसला. संशोधनात आढळले की, शिकण्याचे नुकसान होण्यात दूरस्थ शिक्षणाची मोठी भूमिका आहे. गरीब भागात असलेल्या शाळा दीर्घकाळापासून दूरस्थ शिक्षणावर अवलंबून आहेत. हीच परिस्थिती कृष्णवर्णीय व हिस्पॅनिक विद्यार्थ्यांची होती. हार्वर्डचे अर्थतज्ज्ञ थॉमस केन म्हणतात, शिक्षणाचे नुकसान कायमस्वरूपी राहू दिले तर त्याचे गंभीर परिणाम होतील. त्यांच्या गणनेनुसार, २०२०-२१ मध्ये अर्ध्याहून अधिक काळात अत्यंत गरीब दुर्गम शाळांमधील विद्यार्थ्यांचे २२ आठवड्यांच्या शिक्षणाइतके नुकसान झाले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.