आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Eruption In Sri Lanka; Prime Minister's House Set On Fire By Angry Citizens, Violence Across The Country After The Resignation Of Mahinda Rajapaksa

श्रीलंकेत उद्रेक:पंतप्रधानांचे घर संतप्त नागरिकांनी पेटवले, महिंदा राजपक्षेंच्या राजीनाम्यानंतर देशभर हिंसाचार

कोलंबो2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गंभीर आर्थिक संकटांशी झुंजत असलेल्या श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी सोमवारी राजीनामा दिला. राजीनाम्याच्या काही तासांनंतर हंबनटोटात त्यांचे वडिलोपार्जित घर जाळण्यात आले. आर्थिक संकटासाठी त्यांना जबाबदार ठरवत देशभरात राजीनाम्याच्या मागणीसाठी निदर्शने होत होती.

राजपक्षे यांचे समर्थक आणि निदर्शक यांच्यात झालेल्या चकमकींत सत्तारूढ पक्षाच्या एका खासदारासह तीन जणांचा मृत्यू झाला. दोन खासदारांची घरे जाळण्यात आली. हिंसक निदर्शनानंतर सोमवारी संपूर्ण देशात संचारबंदी लावण्यात आली. राजपक्षे यांच्या समर्थकांनी तसेच विराेधकांनी सर्व प्रमुख शहरांत हिंसाचार घडवला. रात्री उशिरा आलेल्या वृत्तानुसार, राजपक्षे सरकारच्या एक डझनपेक्षा जास्त मंत्र्यांच्या घरांना आग लावण्यात आली. श्रीलंका बार असोसिएशनने म्हटले की, हिंसाचार थांबत नाही, तोपर्यंत लोकांनी आपल्या घराबाहेर पडू नये.

बातम्या आणखी आहेत...