आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावेंडिंग मशीन्सची ओळख स्नॅक्स आणि शीत पेयासारख्या बाबी देण्यासाठी आहेत, मात्र अमेरिकेत याद्वारे अत्यावश्यक औषधांचा पुरवठा सुरू केला आहे. या प्रयोगाच्या यशस्वीतेनंतर अन्य शहरांत औषधांच्या वेंडिंग मशीन्स स्थापन केल्या जात आहेत. ओहायोच्या सिनसिनाटीत अशा प्रकारच्या वेंडिंग मशीनचे चांगले परिणाम समाेर आले आहेत. युनिव्हर्सिटी ऑफ सिनसिनाटीच्या क्लिनिकल फार्मसीचे तज्ज्ञ डॅनियल अरेंड यंाच्या म्हणण्यानुसार, अशा प्रकारची मशीन आकस्मिक आजारांच्या स्थितीत चमत्कारिक पद्धतीने मदत करू शकते. ड्रग्जचा ओव्हरडोस किंवा अन्य कोणत्याही स्थितीत वेंडिंग मशीनकडे सर्वांवर इलाज आहे. नशेचा ओव्हारडोस झाल्यावर वेंडिंग मशीन नेलोक्सोन औषध उपलब्ध करते. हे नाकातून स्प्रे किंवा इजेक्शनद्वारे घेतले जाऊ शकते.मशीनमध्ये गर्भावस्था चाचणी किट, बँडेज, इंजेक्शन किटसारखी सामग्री आहे. सुईच्या वापरानंतर सुरक्षितरित्या विल्हेवाट लावण्यासाठी कंटेनरही आहे. एचआयव्हीच्या क्षेत्रात काम करणारी संघटना कॅराकोलमध्ये संचालक सुजैन बॅचमेयर म्हणाले, याचा उद्देश अौषधांचा वापर करणाऱ्यांना िनरोगी ठेवणे आहे. वेंडिंग मशीन हे काम करत आहे. मशीनच्या एवढ्या वापरामुळे अधिकारी चकित आहेत. औषध सुरक्षा तज्ज्ञ अशा प्रकारच्या वेंडिंग मशीन्स अन्य भागांतही सुरू कराव्यात,असे म्हणत आहेत.
नशेच्या ओव्हरडोसमुळे १ लाख मृत्यू, यामुळे हे प्रयत्न अमेरिकेत १ लाखावर लोकांचा अमली पदार्थाच्या ओव्हरडोसमुळे मृत्यू झाला. अधिकाऱ्यांनुसार, ड्रग अॅडिक्टना नशा करण्यापासून रोखण्यात मदत करू इच्छितो, मात्र त्यांची इच्छित नसली तरी यातून मदत करत आहोत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.