आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Establishment Of Gram Panchayats In China On The Lines Of India, But When The Government Was Opposed, The Rights Were Frozen!

लोकशाहीचे नियम कम्युनिस्ट पार्टी ठरवते:चीनमध्ये भारताच्या धर्तीवर ग्रामपंचायतींची स्थापना, पण सरकारला विरोध होताच अधिकार गोठवले!

औरंगाबाद13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चीन तीन हजार खासदारांसह जगातील सर्वात मोठी लोकशाही असल्याचा दावा करते. परंतु प्रत्यक्षात लोकशाहीच्या नावाने येथे कागदोपत्री खेळ चालतो. चीनने १९८० मध्ये भारतातील पंचायत राज व्यवस्थेच्या धर्तीवर विकेंद्रीकरणाच्या नावाखाली ग्राम पंचायतीची स्थापना सुरू केली. काही दशके ग्राम पातळीवर हे चालत होते. परंतु गेल्या काही वर्षांत तेथे सरकारच्या विरोधात सूर उमटू लागले. त्यामुळे सरकारने चार वर्षांत या ग्राम पंचायतींचे सर्व अधिकार गोठवले. चीनमध्ये महिला तस्करीचे प्रमाण वाढले. मात्र ते रोखण्यासाठी चीनमध्ये प्रभावी कायदे नाहीत. अनेकवेळा अशी प्रकरणे ग्राम पातळीवर सभेत येत असतात. दोन वर्षांपूर्वी शांक्सी प्रांतात असेच प्रकरण समोर आले होते. ग्राम पंचायतीने गुन्हेगारांच्या विरोधात कारवाईचे आदेश दिले होते. परंतु हे प्रकरण कम्युनिस्ट पार्टीचे पदाधिकाऱ्यांशी संबंधित होते. त्यामुळे काहीही कारवाई झाली नाही.

गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे लागू लॉकडाऊन व इतर निर्बंधांच्या विरोधात ग्रामीण भागातील नागरिकांनी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. पण कम्युनिस्ट पार्टीच्या लोकांनी विरोध दडपून टाकला. सत्तेचे विकेंद्रीकरण करत असल्याचे दाखवून चीन प्रत्यक्षात ग्रामीण भागातील या कौन्सिल आपल्या पद्धतीने चालवू लागला आहे. चीनमधील सत्तेची सूत्रे कम्युनिस्ट पार्टी तसेच पक्षाच्या समर्थकांकडे राहिली आहेत.

व्हिलेज कौन्सिलचे प्रस्ताव लागू होत नाहीत
कम्युनिस्ट पार्टी अखेर गुन्हेगारीसंबंधी संहितेचा कायदा कडक करण्याची शक्यता आहे. येल लॉ स्कूलचे चांगहाओ वेई म्हणाले, सरासरी दर चार वर्षांनंतर पंचायतचे नवे रुप पाहायला मिळते. व्हिलेज कौन्सिलने पारित केलेले नियम लागू होत नाहीत.

बातम्या आणखी आहेत...