आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा‘भारताने २०२५ पर्यंत पेट्रोलमध्ये २०% इथेनॉल मिसळण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे वायू प्रदूषण कमी होते, पण जलप्रदूषण आणि पाणी आणि अन्नाची असुरक्षितताही निर्माण होते. केस स्टडी म्हणून ब्राझीलची भारताला माहिती असणे आवश्यक आहे,’ असे डॉ. जेनिफर एग्लिन यांचे म्हणणे आहे. त्या अमेरिकेतील ओहायो स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये पर्यावरण इतिहासाच्या प्राध्यापक आणि इथेनॉल विशेषज्ञ आहेत. रितेश शुक्ल यांना दिलेली माहिती :
-इथेनॉल हरित इंधन का आहे?
इथेनॉल बटाटे, द्राक्षे, ऊस, मका आदी पिष्टमय पिकापासून बनवता येते. इथेनॉल कार पेट्रोलियमवर चालणाऱ्या कारपेक्षा ७०% कमी हायड्रोकार्बन, ३०% कमी नायट्रोजन आणि ६५% कमी कार्बन मोनॉक्साइड सोडतात. इथेनॉलवर चालणाऱ्या वाहनांमुळे वायूप्रदूषण होत नाही. म्हणून ते हिरवे इंधन (ग्रीन फ्यूएल) आहे.
-ब्राझीलबाबत अनुभव कसा राहिला आहे?
ब्राझीलमध्ये १९६४ ते १९८५ दरम्यान यात तेजी आली, जेव्हा लष्करी हुकूमशाहीचा काळ होता. १९७० च्या दशकात, पेट्रोलमध्ये २०% इथेनॉल वापरण्याची परवानगी होती. १९७९ मध्ये फक्त ०.३% गाड्या इथेनॉलवर चालत होत्या. १९८५ मध्ये हा आकडा ९६% वर पोहोचला. १९९८ पर्यंत, जलप्रदूषण आणि अन्न असुरक्षिततेमुळे ही संख्या फक्त ०.१% पर्यंत घसरली होती. २००३ मध्ये इथेनॉल-गॅसोलीनवर चालणाऱ्या हायब्रिड कारना परवानगी देण्यात आली. ब्राझीलच्या अनुभवातून धडा घेतला पाहिजे.
-इथेनॉलमुळे काय समस्या येतात ? -ते बनवण्याच्या प्रक्रियेत जलप्रदूषण होते. पाणीही अनेक पटीने लागते. जिवाश्म इंधनापासून एक गिगाज्युल इंधनाच्या तुलनेत इथेनॉलपासून इतके इंधन तयार करण्यासाठी ७८ पट जास्त पाणी लागते. एक लिटर इथेनॉल तयार करण्यासाठी १० ते १६ लिटर विषारी कचरा जलस्रोतांमध्ये सोडला जातो. १९७९ ते १९८५ पर्यंत इथेनॉलचे उत्पादन वार्षिक ५० कोटी लिटरवरून एक हजार कोटी लिटरपर्यंत वाढले. डिसेंबर २०२१ पर्यंत तेथील जलस्रोतांची पातळी ८०% कमी झाली व २० वर्षांतील भीषण दुष्काळ पडला. -एक लिटर इथेनॉलमध्ये ५,१३० किलो कॅलरी ऊर्जा असते; परंतु त्यातील ६.६ किलो कॅलरी ऊर्जा खर्च होते. भूक मिटवण्यासाठी धान्य आवश्यक आहे, पण इंधन बनवण्यासाठी धान्य पिकवणे विनाशकारी ठरू शकते.
-इथेनॉलसह इलेक्ट्रिक वाहनांचे संकरीकरण करणे योग्य ठरेल का?
इंडिया स्पेंडने अहवाल दिला आहे की एका वर्षात, एक हेक्टरवर लावलेल्या सौरऊर्जा प्रकल्पाने चार्ज करून एक इव्ही कार जितका रस्ता पार करेल तोच मार्ग इथेनॉलने गाठण्यासाठी १८७ हेक्टर जमीन लागेल. तेव्हा आता तुम्हीच निर्णय घ्या.
-०.७% तेलाचा खर्च विरुद्ध पाणी, जंगल, जमीन; भारत ब्राझीलच्या मार्गाने?
भारतातील ई-२० प्रकल्पांतर्गत २०२५ पर्यंत २०% इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळले जाईल. इंडिया स्पेंडच्या अहवालानुसार असे केल्याने भारताचा वार्षिक ३० हजार कोटी रुपयांचा पेट्रोलियम खर्च वाचेल. हे एकूण खर्चाच्या ०.७ % असेल. आता भारताला ठरवायचे आहे की, ०.७% तेल विरुद्ध जल, जंगल, जमिनीतून काय वाचवायचे आहे?
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.