आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनाची भीती:युरोप : महिन्याभरात वाढले 50% रुग्ण, जर्मनीत संसर्गाचा नवा विक्रम

न्यूयॉर्क/बुडापेस्ट/नवी दिल्ली22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • यूरोप-मध्य आशियातील 53 देशांमध्ये वाढला धोका : डब्ल्युएचओ

जर्मनीसह युरोपातील अनेक देशांत संसर्गाची नवीन प्रकरणे वाढल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने पुन्हा धोक्याचा इशारा दिला आहे. क्षेत्रीय प्रमुख हेंस क्लूज म्हणाले की, ‘युरोपमध्ये महिन्याभरात संसर्गाचे प्रमाण ५० टक्क्यांनी वाढले आहे. लसीकरण जलद गतीने सुरू असूनही, प्रकरणांमध्ये वाढ होण्याचे प्रमाण ही चिंतेची बाब आहे. अशीच प्रकरणे वाढत राहिली तर फेब्रुवारी २०२२ पर्यंत या भागात कोरोनामुळे ५ लाख लोकांचा मृत्यू होऊ शकतो. युरोप आणि मध्य आशियातील ५३ देशांमध्ये कोरोनाची आणखी एक लाट येण्याचा धोका आहे.’

डब्ल्युएचओच्या युरोप कार्यालयाने सांगितले की, या क्षेत्रात आठवड्याभरात सुमारे १.८ दशलक्ष प्रकरणे समोर आली आहेत, जी मागील आठवड्याच्या तुलनेत ६ टक्क्यांनी आधिक आहेत आणि सप्ताह भरात २४,००० मृत्यूंची नोंद झाली आहे. मृतांच्या संख्येतही १२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. युरोपमधील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या जर्मनीने सलग दुसऱ्या दिवशी कोरोना संसर्गाचा विक्रम केला आहे. २४ तासांत येथे ३७,१२० नवे रुग्ण आढळले आहेत.

कोरोनानंतर १० ते ११ वर्षीय मुलांमध्ये भावनिक समस्या
ब्रिटनमधील ज्या मुलांनी कमी भाज्या खाल्ल्या, कमी व्यायाम केला, त्यांना कोरोनानंतर भावनिक अडचणींचा सामना करावा लागला, असा निष्कर्ष ‘कार्डिफ’ विद्यापीठात झालेल्या एका संशोधनात समोर आला आहे. २०१९ मधील सर्वेक्षणाच्या तुलनेत २०२१ च्या सुरुवातीला प्राथमिक शाळेतील मुलांच्या भावनिक अडचणींमध्ये तीव्र वाढ झाल्याची बाब या अभ्यासात समोर आली. एप्रिल ते जून दरम्यान २७% मुलांमध्ये अशा समस्या दिसून आल्या. तर २०१९ मध्ये केवळ १७% मुलांना वर्तणुकीशी संबंधित अडचणी होत्या. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ९०% मुलांनी त्यांचे शिक्षक त्यांची काळजी घेत असल्याचे सांगितले.

अमेरिका : आठवड्यानंतर रुग्ण पुन्हा ८० हजार पार
अमेरिकेत रुग्ण संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. २४ तासांत ८१ हजार ३३ नवे संक्रमित आढळले. जे गुरुवारच्या तुलनेत ५ हजाराने अधिक आहे. आठवडाभरानंतर पहिल्यांदाच रुग्णांचा आकडा 80 हजारांवर गेला आहे. तसेच मृतांचा आकडा पुन्हा ११०० च्या पुढे गेला आहे.

रशियात मृत्यूचा आकडा ११०० पार, ब्रिटनमध्येही वाढली चिंता
रशियामध्ये २४ तासांत ४० हजार ७३५ नवे रुग्ण आढळली, जी आदल्या दिवसापेक्षा ५०० ने जास्त आहे. दररोज मृत्यूचा आकडा ११०० पार जात असून, २४ तासांत ११९५ जणांचा मृत्यू झाला आहे.

ब्रिटनमध्ये रुग्ण ४० हजारावर : ब्रिटनमध्ये नव्या रुग्णांची संख्या पुन्हा एकदा ४० हजाराच्या पुढे गेली आहे. तेथे २४ तासांत ४१ हजारापेक्षा जास्त रुग्ण आढळले.

सोमवारपासून जपान उघडणार सीमा
जपानमध्ये कोरोना निर्बंध शिथिल करण्याचा आणि अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी सोमवारपासून क्रमाक्रमाने सीमा उघडण्यात येणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...