आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेलारूस-पोलंड वाद:युरोप 30 वर्षांनंतर युद्धाच्या उंबरठ्यावर; रशियाचा धोका, ब्रिटनचे लष्करप्रमुख कार्टर यांचा इशारा

लंडन22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शीतयुद्धानंतर चर्चेसाठी माध्यम नसल्याने पेच वाढण्याची भीती

ब्रिटनचे लष्करप्रमुख निक कार्टर यांनी सनसनाटी दावा केला आहे. बेलारूस व पोलंड यांच्यातील स्थलांतरितांच्या प्रश्नी रशियाने हस्तक्षेप केल्याने युरोप युद्धाच्या उंबरठ्यावर आहे. शीतयुद्ध संपल्याच्या ३० वर्षांनंतर पहिल्यांदाच रशियाची महत्त्वाकांक्षा संपूर्ण खंडासाठी मोठा धोका ठरली आहे.

कार्टर म्हणाले, ब्रिटन, अमेरिकेसह नाटो देशांचा पोलंडला पाठिंबा आहे. परंतु रशिया हे प्रकरण पेटवण्याच्या प्रयत्नात आहे. युक्रेनवर हल्ला करण्याचाही रशियाचा मनसुबा आहे. शीतयुद्धादरम्यान अस्तित्वात असलेली यंत्रणाही आता नाही. अशा परिस्थितीत रशियाशी चर्चा करण्यासाठी प्रयत्नदेखील करता येत नाहीत. आता ही समस्या कशा प्रकारे सोडवायची याची मोठी जबाबदारी नेत्यांवर आहे. ते कशा प्रकारे ही समस्या सोडवतात हे पाहावे लागेल, असे कार्टर यांनी म्हटले आहे. गेल्या काही वर्षांत जग खूप बदलले आहे, ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी, असे कार्टर यांनी सुचवले आहे.

पोलंडचे संरक्षणमंत्री ब्लासजॅक म्हणाले, सिरिया, इराक व येमेनच्या स्थलांतरितांना बेलारूस ढाल बनवत आहे. त्यामुळे ही समस्या आणखी जटिल रूप घेईल. बेलारूसचे राष्ट्रपती लुकाशेंको म्हणाले, आमच्या सरहद्दींचे संरक्षण करण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करू. रशियाकडून सैन्य मदत मिळत असल्याचा आरोप त्यांनी फेटाळून लावला आहे. रशिया बेलारूसचा जुना मित्र आहे, हे त्यांनी मान्य केले.

वादाशी संबंध नाही, युरोपने बेलारूसशी चर्चा करावी : पुतीन
रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी शनिवारी सायंकाळी सरकारी टीव्हीवर एक मुलाखत दिली. या मुलाखतीत पुतीन म्हणाले, पोलंड व बेलारूस यांच्यातील पेचप्रसंगाशी रशियाचे देणे-घेणे नाही. तेथे काही समस्या असल्यास युरोपीय संघ व त्यांच्या समर्थक देशांनी बेलारूसचे राष्ट्रपती लुकाशेंको यांच्याशी चर्चा करायला हवी. लुकाशेंको व जर्मन चॅन्सलर अँगेला मर्केल यांच्यात चर्चा सुरू होती. त्यातून तोडगा निघू शकतो. पश्चिमेकडील देशांचा इतिहास सर्वांना ठाऊक आहे. मध्यपूर्वेतील त्यांचा हस्तक्षेप उघड आहे.

पोलंड सैनिकांच्या डोळ्यांवर लेझरचा मारा करून त्रास
बेलारूसच्या सैन्य तुकड्या सीमेवर तैनात पोलंड सैनिकांच्या डोळ्यांवर लेझर लाइटचा मारा करत आहेत. त्यांची दिशाभूल करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये पोलंडचे सैनिक डोळे चोळताना दिसून येतात. बेलारूसच्या अनेक कुरापती यातून समोर आल्या आहेत. बेलारूसने आपल्या सीमेत मध्यपूर्वेतील स्थलांतरितांना अश्रुधुराच्या नळकांड्या दिल्या आहेत. त्याचा वापर पोलंडच्या सैनिकांवर करण्यास त्यांनी सांगितले आहे. बेलारूसने ठिकठिकाणचे काटेरी कुंपणदेखील नष्ट केले आहे. बेलारुसच्या कुरापती वाढल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...