आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लॉकडाउनला विरोध:युरोप : अनेक शहरांत लॉकडाऊनच्या विरोधात निदर्शने; ब्रिटन, पोलंडमध्ये अनेक अटकेत

लंडनएका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • जगभरात 7 दिवसांत दोनवेळ संसर्गात घट, 4 वेळा वाढ

 युरोपीय देशांतील अनेक शहरांत लॉकडाऊनच्या विरोधात निदर्शनांत वाढ झाली आहे. ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये लोकांनी हिंसक निदर्शने केली. पोलिसांनी येथे १३ जणांना अटक केली. पोलंडची राजधानीत पोलिसांनी निदर्शकांना हटवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. या प्रकरणात एका खासदारास ३० जणांना अटक झाली आहे. जर्मनीच्या स्टटगार्ट शहरात प्रशासनाने ५ हजार लोकांना एके ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करून आंदोलन करण्याची परवानगी दिली होती, परंतु गर्दी वाढतच गेली. त्यामुळे पोलिसांनी सक्तीने लोकांना इतर ठिकाणी हलवले. म्युनिचमध्ये लॉकडाऊनच्या विरोधात आंदोलन झाले. ते सातत्याने कर्णकर्कश आवाजात संगीत लावत होते. रशियात सलग १५ दिवसांपासून दररोज ९ हजारांहून जास्त रुग्ण आढळून आले. येथे आतापर्यंत २ लाख ८१ हजार ७५२ रुग्ण आढळून आले. संसर्गात रशियात दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे, परंतु टॉप-१० देशांत सर्वात कमी मृत्यू मात्र रशियात झाले. रशियामध्ये सुमारे २ हजार ६३१ जण मृत्युमुखी पडले.

बातम्या आणखी आहेत...