आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनामुळे अनुशेष वाढला:युरोप आजारी; आता डॉक्टरांना लाच, शस्त्रक्रियेसाठी प्रतीक्षा

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

युरोपातील आरोग्य यंत्रणा आजारी पडली आहे. पश्चिमेकडील युरोपीय देशातही ही व्यवस्था कोलमडली आहे. ब्रिटनमध्ये सुमारे ६५ लाख नागरिक उपचाराच्या प्रतीक्षेत आहेत. हा आकडा २०१९ च्या तुलनेत ५० टक्के जास्त आहे. स्पेनमध्ये शस्त्रक्रिया करण्यासाठी १२३ दिवसांची प्रतीक्षा यादी आहे. हा १८ वर्षांतील विक्रम आहे. या समस्येला कोरोना महामारी कारणीभूत ठरल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. काेरोनाच्या काळात युरोपच्या आरोग्य यंत्रणेवर अतिरिक्त भार पडला. परिस्थिती अतिशय वाईट आहे. साध्या तपासणीसाठीदेखील डॉक्टर तसेच परिचारिकांना लाच द्यावी लागत आहे. लंडनच्या इम्पिरियल कॉलेजच्या ताज्या पाहणीतून हा दावा करण्यात आला आहे. काेरोनाच्या काळात रुग्णालयांमध्ये इतर आजारांवरील रुग्णांची भरती करण्यात आली नव्हती. त्यामुळेच कोरोना संपत असतानाच आता इतर आजाराने पीडित असलेले लोक मोठ्या संख्येने रुग्णालयात येऊ लागले आहेत. युरोपात अजूनही पाच लाख डॉक्टरांचा तुटवडा आहे. त्याचबरोबर १० लाख आरोग्य सहायकाचीदेखील गरज आहे. त्यामुळे अनेक देशांत रुग्णांना योग्य उपचार मिळत नाहीत.

१० पैकी ४ जणांना वैफल्य, हा वर्ग पीडित
युरोपीय मेडिकल कौन्सिलच्या यंदाच्या अहवालात युरोपात प्रत्येकी १० पैकी ४ व्यक्ती वैफल्यग्रस्त आहेत. डॉक्टरांची पुरेशी उपलब्धता नसल्यामुळे रुग्णांना अपॉइंटमेंट मिळत नाही. फ्रान्समध्ये डिप्रेशनच्या पीडितांना तपासणीसाठी ६० दिवसांची प्रतीक्षा करावी लागते.

२४ लाख कोटी खर्चातून स्थिती सुधारण्याची आशा
युरोपातील अनेक देशांतील ही परिस्थिती सुधारण्यासाठी व संकट कमी करण्यासाठी २४ लाख कोटी रुपये खर्च केले. जर्मनीने ८ लाख कोटी रुपये, फ्रान्सने ५ लाख कोटी रुपये, इटलीने ४ लाख कोटी रुपये खर्च केले. पूर्व युरोपातील यंत्रणेसाठी युरोपीय संघाने निधी दिला.

१० कोटी कॅन्सर स्क्रीनिंग रखडल्या
युरोपीय कॅन्सर ऑर्गनायझेशनच्या म्हणण्यानुसार युरोपात सुमारे १० कोटी कॅन्सर स्क्रीनिंग टेस्ट होऊ शकलेल्या नाहीत. ब्रिटनचे डॉ. मार्क लॉलर म्हणाले, कोरोनामुळे कर्मचाऱ्यांचा अनुशेष आहे. म्हणूनच अनेक वर्षे आपली क्षमता १३० टक्के ठेवून काम करावे लागणार आहे.

बातम्या आणखी आहेत...