आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Europe Unlocked ... But Only Citizens Of European Countries Can Go, 80% Of European Countries Open Their Borders

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना:युरोप अनलॉक... मात्र युरोपीय देशांतील नागरिकच जाऊ शकतील, ८०% युरोपीय देशांनी सीमा खुल्या केल्या

पॅरिस/बर्लिन10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मॅक्रॉन म्हणाले- फ्रान्सने पहिली लढाई जिंकली

युरोपातील अनेक देशांनी तीन महिन्यांनंतर सोमवारपासून आपल्या सीमा उघडल्या. उन्हाळ्याच्या सुटीत लोकांना बाहेर फिरायला जायला आवडते यामुळे हा निर्णय घेण्यात आला. मात्र, हे अनलॉक केवळ युरोपीय देशांच्या लोकांसाठी आहे. अमेरिका, आशिया, लॅटिन अमेरिका आणि मध्यपूर्वेतील लोकांना युरोपात जाण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागेल. युरोपातील ४४पैकी ३५ (८०%) देशांनी सीमा उघडली आहे.

फ्रान्समध्ये अनलॉकनिमित्त राष्ट्राध्यक्ष इम्यॅनुएल मॅक्रॉन यांनी सांगितले की, देशाने कोरोनाविरोधातील पहिले युद्ध जिंकले आहे, लॉकडाऊननंतर अर्थव्यवस्था पुन्हा सुरळीत करण्याची वेळ आली आहे. ईयूच्या शेन्झेन झोनमध्ये सहभागी शेजारच्या देशांसाठी सीमा खुल्या केल्या. यंदाचा उन्हाळा आधीच्या तुलनेत वेगळा असेल.

लंडन अनलॉक: ८४ दिवसांनी उघडला बाजार, लांब रांगा

लंडन | इंग्लंडमध्येही ८४ दिवसांनी सोमवारपासून बाजार उघडण्यात आला. देशभरात दुकानांवर लोकांच्या लांब रांगा दिसल्या. बहुतांश ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन झाले नाही. दोन मीटर डिस्टन्सिंगचे आदेश होते. मात्र, दरवाजा उघडताच लोक तुटून पडले. येथे कोरोनामुळे २३ मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आला होता. माध्यमांतील वृत्तानुसार या दुकानांवर लॉकडाऊनमुळे सुमारे १.४३ लाख कोटी रुपयांच्या वस्तू पडून होत्या. स्टोअर्सशिवाय ड्राइव्ह-इन सिनेमा, सफारी पार्क, प्राणिसंग्रहालय आणि धार्मिक स्थळेही खुली करण्यात आली. मात्र तपासणीनंतरच प्रवेश दिला जात आहे. इंग्लंडमध्ये कोरोनाची २.९५ लाख प्रकरणे असून ४१ हजारापेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. छायाचित्र लंडनच्या ऑक्सफोर्ड स्ट्रीट स्टोअर्सचे आहे.

जर्मनीने नऊ देशांलगतची सीमा केल्या खुल्या: 
जर्मनीनेही युराेपीय देशांवरील बंदी हटवली आहे. जर्मनीने म्हटले आहे की, ऑस्ट्रिया आणि डेन्मार्कलगतच्या सीमांसह नऊ देशांसोबतच्या सीमेवर चेकपोस्ट आवश्यक नाहीत. बेल्जियम, पोर्तुगाल, ग्रीस आणि स्वित्झर्लंडनेही प्रवासावरील बंदी हटवली आहे. ऑस्ट्रिया मंगळवारपासून चार देश वगळता सर्वांना प्रवेश देईल. युरोपात कोरोनामुळे १.८२ लाख जणांचा मृत्यू झाला आहे. जगातील बाधितांपैकी युरोपात २० लाख आहेत.

बातम्या आणखी आहेत...