आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कायदा मंजूर:वेठबिगारीतील चिनी वस्तू युरोप घेणार नाही ; दक्षिण पूर्व आशियातील देशांची चिंता वाढली

बर्लिन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वेठबिगारीतून तयार केलेल्या वस्तूंच्या सामग्रीवर युरोपीय आयोगाने निर्बंध घातले आहेत. या संदर्भात गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये एका कायदा मंजूर केला आहे. याद्वारे चीनसह दक्षिण पूर्व आशियातील देशांची चिंता वाढली आहे. जगभरात सुमारे २ कोटी ८० लाख लोक बळजबरीने काम करतात. यामध्ये निम्म्यापेक्षा जास्त लोक आशिया-प्रशांत प्रदेशात राहतात. संयुक्त राष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या २०२२ च्या अहवालानुसार, २०१६ च्या तुलनेत बळजबरीने कामावर ठेवलेल्या लोकांची संख्या १० पट झाली आहे. गेल्या वर्षी युरोपीय संघटनेच्या अधिकाऱ्यांनी हा प्रस्ताव ठेवल्यानंतर तो चीनची आयात रोखण्यासाठी आहे,असे मानले गेले.