आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काेराेनाची दुसरी लाट:अडीच लाख मृतांचा टप्पा ओलांडणारा युराेप दुसरे बेट, तरीही नागरिकांची लाॅकडाऊनच्या विराेधात निदर्शने

पॅरिस/लंडन/वॉशिंग्टनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 3.25 लाख मृतांसह लॅटिन अमेरिका जगात सर्वात पुढे

युराेपच्या ४४ देशांत काेराेनाची दुसरी लाट आली आहे. लॅटिन अमेरिकेनंतर अडीच लाख मृत्यूंचा टप्पा आेलांडणारा युराेप जगातील दुसरे बेट ठरले आहे. त्यामुळे १० पेक्षा जास्त देशांत लाॅकडाऊन आणि रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पण गंभीर परिस्थिती असतानाही नागरिक त्याच्या विराेधात निदर्शने करत आहेत.शुक्रवारी रात्री काही शहरांमध्ये लोकांनी जाळपोळ सारख्या घटना घडवून आणल्या. बार , रेस्टॉरंट चालवणारे लॉकडाऊन हटविण्याची मागणी करत आहेत. ते म्हणतात की या लॉकडाऊनमुळे उपासमार होऊ शकते. युरोपच्या अडीच लाख मृत्यूंमध्ये ब्रिटन, इटली, फ्रान्स, रशिया, बेल्जियम आणि स्पेन यांचा दाेन तृतीयांश हिस्सा आहे.

ब्रिटन : १७ दिवसांचा लाॅकडाऊन : येथे आतापर्यंत ४५ हजार मृत्यू झाले, जे युराेपातील सर्वाधिक आहेत. वेल्समध्ये शनिवारपासून १७ दिवसांचा लाॅकडाऊन सुरू झाला. यामुळे ३१ लाख लाेक घरात कैदेत राहतील. ग्रेटर मॅन्चेस्टर, लिव्हरपूल शहर लँकशायरमध्ये जवळपास ७१ लाखांच्या लाेकसंख्येवर याचा परिणाम हाेईल.

अमेरिका : ३८ राज्यांची खराब स्थिती : ३.२५ लाखांच्यावर गेला आहे. अमेरिकेतल्या ३८ राज्यांची परिस्थिती खराब आहे. येथे शुक्रवारी ८० हजार नवीन प्रकरणे समाेर आली.