आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Even After 20 Years Of Fighting, It Is Now Feared That Al Qaeda Will Re emerge; News And Live Updates

जगासमोर चिंता:20 वर्षे लढाई केल्यानंतरही आता पुन्हा अल-कायदा फणा काढण्याची भीती; अफगाणिस्तान मायदेश सोडण्याची वेळ आलेल्या नागरिकांच्या वेदना.

ब्रुसेल्स2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आम्ही दहशतवाद्यांच्या उच्चाटनासाठी गेलो होतो, आता तेच सत्ताधारी झाले : ब्रिटनचे माजी हेर

९/११ दहशतवादी हल्ल्याचे उत्तर म्हणून अमेरिकेने अफगाणिस्तानात पाऊल ठेवले हाेते. हा हल्ला अल-कायदा या दहशतवादी संघटनेने केला हाेता. त्याला तालिबानचा पाठिंबा आहे. आता अफगाणिस्तानात अल-कायदासारख्या दहशतवादी संघटनांना आश्रय मिळणार आहे, असे तज्ज्ञांना वाटते. तालिबानच्या विजयामुळे जगभरात दहशतीचा प्रसार माेठ्या प्रमाणात हाेऊ शकताे, असे जाणकारांना वाटते. दहशतवाद प्रतिबंधक माजी अमेरिकन समन्वयक नाथन सेल्स म्हणाले, तालिबानच्या अफगाणिस्तानवरील वर्चस्वामुळे अमेरिकेसाठी दहशतवादाची जाेखीम वाढू शकते. अल-कायदाला अफगाणिस्तानमध्ये आश्रय मिळेल हे जवळपास निश्चित आहे.

तालिबान अल-कायदाचा वापर अमेरिका आणि सहकारी देशांच्या विराेधात कट करण्यासाठी करेल. ब्रिटनचे परराष्ट्र गुप्तचर सेवा विभागाचे माजी प्रमुख जाॅन साॅवर्स यांनीही चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, आम्ही दहशतवादाच्या उच्चाटनासाठी अफगाणिस्तानात पाऊल ठेवले हाेते. आता दहशतवाद्यांचा साथीदार तालिबानने अफगाणवर वर्चस्व मिळवले. तालिबानची सत्ता धाेकादायक असेल. कदाचित तालिबानने २० वर्षांत काही गाेष्टी शिकल्याही असाव्यात. परंतु दाेहामध्ये शांतता चर्चेत नेतृत्व करणाऱ्या तालिबान दहशतवाद्यांवर किती नियंत्रण ठेवले जाईल, हा प्रश्न आहे. पंचतारांकित हाॅटेलमध्ये बसून चर्चेच्या तुलनेत गृहयुद्धात प्रत्यक्ष सहभागी असणाऱ्यांंची ताकद जास्त असते.

किंग्ज काॅलेज लंडनमध्ये सुरक्षा अध्ययनाचे प्राेफेसर पीटर न्यूमन म्हणाले, तालिबान अमेरिकेच्या विराेधात दहशतवाद्यांना चिथावणी देईल. तालिबान कट्टरवाद्यांचा शैतान आहे. अल-कायदाचे समर्थक तालिबानच्या विजयाचा जल्लाेष करत आहेत. अल-कायदाचे अनेक दहशतवादी अमेरिकेशी लढण्याची तयारी करत आहेत. राॅयल युनायटेड सर्व्हिसेस इन्स्टिट्यूटमधील दहशतवाद विषयातील तज्ज्ञ रॅफॅलाे पंतुची म्हणाले, साेशल मीडिया व चॅट रूममध्ये जिहादींचा आसुरी आनंद स्पष्टपणे दिसून येताे.

मनमानी: काबूलमध्ये तोडफोड, राष्ट्रपती भवनात मेजवानी
राजधानी काबूलमध्ये घुसल्यानंतर ठिकठिकाणी तालिबानी दहशतवादी दिसून येत होते. काही रिकाम्या जिममध्ये ते घुसले व तेथे हे दहशतवादी व्यायाम करत होते. काही मनोरंजन उद्यानात मौजमस्ती करताना दिसून आले. तालिबानच्या दहशतवाद्यांनी अनेक ठिकाणी तोडफोडही केली. काही भागात गोळीबार केला. त्याशिवाय तालिबानी दहशतवाद्यांनी आधी तर राष्ट्रपती भवनात नृत्य-गीत गाऊन जल्लोष केला. नंतर राष्ट्रपती भवनात शाही भोजनही केले.

धारणा : अफगाणी सैन्याची शरणागती कट असावा
अफगाणिस्तानातील सेंट्रल बँक डीएबीचे गव्हर्नर अजमल अहमदी यांनी देश सोडला आहे. त्यांनी देश सोडल्यानंतर १८ ट्विट करून आपबीती मांडली. त्यांनी माजी राष्ट्रपती अशरफ गनी व त्यांच्या सल्लागारांवर ठपका ठेवला आहे. दहशतवादी शहरात घुसले होते. तेव्हा मी काम करत हाेतो. अफगाणी सैनिकांनी एवढ्या लवकर चौक्या कशा सोडल्या यावर विश्वास बसत नाही. उत्तर अफगाणिस्तानात सैन्याची शरणागती हा कटाचा परिणाम होता.

महिला सुरक्षित, तालिबानचे महिला पत्रकारास आश्वासन
तालिबानने अफगाणिस्तानमधील प्रसिद्ध वाहिनी टाेलो न्यूजच्या महिला पत्रकार बेहेस्टा अरघंद यांना मुलाखत दिली. तालिबानी प्रवक्ता म्हणाला, महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य राहील. त्यांना काम करण्याची परवानगी दिली जाईल. महिलांनी सरकारमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहनही प्रवक्त्याने केले. या मुलाखतीला अतिशय महत्त्वाचे मानले जात आहे. महिलांच्या नोकरी करण्याला नेहमीच आक्षेप होता. म्हणूनच हे नाटक तर नाही ना, असा संशय काहींनी व्यक्त केला आहे.

नव्या अफगाणिस्तानविषयी चीन, रशिया, पाकिस्तानला चिंता
अफगाणिस्तानातील सद्य:स्थितीची जगभरात चर्चा सुरू आहे. प्रत्येक देश यातून आपल्या लाभ-हानीचा विचार करू लागला आहे. आतापर्यंत भारताने या संपूर्ण प्रकरणावर काहीही अधिकृतपणे स्पष्ट केलेले नाही. परंतु तालिबान वाढल्यास रशिया, चीन व पाकिस्तानला जास्त धाेका आहे. त्यांनी तालिबानचे समर्थन किंवा विरोधही केलेला दिसत नाही. भारताच्या संदर्भात माजी परराष्ट्र सचिव श्याम सरन यांच्याशी दैनिक भास्करचे रितेश शुक्ल यांनी चर्चा केली. त्यात ते म्हणाले, तालिबान वाढणे म्हणजे दहशतवादी संघटनांच्या नव्या ब्रीडिंग ग्राउंडला जन्म देण्यासारखे ठरेल. या चर्चेचा हा अंश-

९/११ नंतर भलेही तालिबानला पाकने आश्रय दिला; पण पाकवर नेहमीच राहणार युद्धाचे संकट

अफगाणिस्तान सरकार एवढ्या सहजपणे शरण का गेले?
गनी सरकार कार्यकाळात फार प्रभाव दाखवू शकले नाही, हे आपण स्वीकारले पाहिजे. सरकार एवढ्या सहजपणे शरणागती घेईल, असे काुणालाही वाटले नव्हते. सैन्य संख्या व लाेकांचा पाठिंबा असूनही देशभरात अराजक निर्माण झाले. त्यामुळे गनी सरकार कमकुवत असल्याचे स्पष्ट झाले.

भारताने सद्य:स्थितीकडे कसे पाहायला हवे?
भारताने सद्य:स्थितीकडे बारकाईने पाहिले पाहिजे. तालिबान पाकिस्तानच्या मदतीने वाढला. तालिबान बदलल्याचा प्रचार केला जात आहे. संघटना राष्ट्रवादी बनल्याचा दावा केला जाताे. सरकार स्थापन हाेताच संघटना पाकिस्तानविराेध दाखवू लागेल. अशा प्रकारच्या गाेष्टींना फेटाळून लावले पाहिजे.

मग पाकचा विजय मानावा लागेल?
अमेरिकेत ९/११ नंतर तालिबान सरकारमधून बाहेर पडले. तेव्हापासून आतापर्यंत पाकिस्तानने ही संघटना सांभाळली आणि तिला सशक्त केले. पाकला दाेन्ही सीमांवर युद्धाची भीती वाटे.

दहशतवादाविराेधातील भारत आता तालिबानशी कसे संबंध ठेवेल?
तालिबानशी संपर्क स्थापन करणे एक टॅक्टिकल चाल आहे. ती गरजेची आहे. स्वत:ला वाचवण्यासाठी भारतावरील आक्रमणाकडे दुर्लक्ष करा अशा पद्धतीचा एखादा करार तालिबान चीन, रशिया तसेच इतर देशांसाेबत करू शकताे. हे आपण विसरून चालणार नाही.

यामागील कारण काय असू शकते?
आपण इतिहास विसरता कामा नये. हक्कानी नेटवर्क आयएसआयचा एक भाग आहे. ताे तालिबानचा साथीदार आहे. तालिबानमुळे अफगाणमधील अशा गटांची शक्ती वाढेल. म्हणुनच भारताला व्यापक आव्हानांसाठी तयार व्हावे लागेल. प्रत्येक परिवर्तनात संधी असते. ती आेळखता आणि तिचा वापर करता आला पाहिजे.

दिवाळखाेर पाक तालिबानला पैसा कसा काय पुरवू शकेल?
पाकिस्तानने पूर्वीही तालिबानला आपल्या खिशातून पैसा दिला नाही. पूर्वी ताे साैदीसारख्या देशांतून साधनांचे जुगाड करत. आता रशियासाेबत चीन समीकरणात नवे पात्र हाेऊन समाेर येत आहे.

इतर देशांना धाेका वाढणार नाही ?
अफगाणिस्तानात १० हजारांहून जास्त परदेशी दहशतवादी सक्रिय आहेत. लष्कर-ए-ताेयबा, जैश-ए-माेहंमद, अल-कायदा व इसिस येथे सक्रिय आहे. आगामी काळात संघटनेला वाढवण्याचे वातावरणही येथे मिळेल. हा सर्वांसाठी धाेका असेल.

बातम्या आणखी आहेत...