आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराह्रदयविकाराच्या झटक्यानंतरही हृदयाचे ठाेके सुरू राहू शकतात. कॅलिफाेर्निया विद्यापीठाने केलेल्या संशाेधनात ही बाब समाेर आली आहे. झटक्यानंतर मृत झालेल्या पेशींना हार्मोनच्या साह्याने पुन्हा जिवंत केले जाऊ शकते, असे संशाेधकांच्या समाेर आले आहे. विशेष म्हणजे ही प्रक्रिया अगदी नैसर्गिक आहे. हा प्रयोग तूर्त उंदरांवर करण्यात आला आहे. ताे यशस्वी झाला आहे. माणसावर हा प्रयोग अद्याप झालेला नाही. हे परीक्षण माणसावर यशस्वी ठरल्यास हृदयविकाराचा झटका येणाऱ्यांना सहजपणे वाचवता येणार आहे. उंदरांवरील प्रयोगात सिंथेटिक मेसेंजर रायबाेन्युक्लिक अॅसिडचा वापर करण्यात आला आहे. या तंत्रज्ञानात एमआरएनए डीएनएच्या अनुक्रमाचे एक ब्लूप्रिंट तयार करते. शरीर प्रथिनांच्या निर्मितीसाठी त्याचा वापर करत असते. प्रथिनांतून पेशींची निर्मिती हाेते. नियंत्रित केले जाते. एमआरएनएमध्ये बदल घडवून वेगवेगळ्या जैविक प्रक्रियांसाठी वेगवेगळ्या सूचना करण्याचा संशाेधकांचा त्यामागील उद्देश आहे. हा संदेश स्टेमिन व वायएपीएसएद्वारे निर्माण हाेताे. दोन्ही हार्मोन हृदयाच्या मांसपेशींच्या कार्डियोमायोसाइट्सला सक्रिय करतात. त्याचा उद्देश हृदयातील मृत पेशींना जिवंत करणे असा आहे.
जगातील एकूण मृत्यूपैकी एक चतुर्थांश झटक्याने हृदयविकाराचा
झटका हा गंभीर आजार आहे. जगभरातील एकूण मृत्यूपैकी हृदयविकाराने हाेणाऱ्या मृत्यूचे प्रमाण एक चतुर्थांश आहे. गेल्या वीस वर्षांत या आजारामुळे वाढलेल्या मृत्यूचे प्रमाण २० लाखांहून जास्त आहे. २०१९ पर्यंत हा आकडा ९० लाखांवर गेला आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.