आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइस्त्रायलमध्ये एक नोव्हेंबरला हाेऊ घातलेल्या निवडणुकीसाठी राजकीय रस्सीखेच सुरू झाली आहे. ताज्या पाहणीनुसार आज निवडणूक घेतल्यास माजी पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या पक्षाला १२० जागांच्या सभागृहात ५७ जागा मिळू शकतात. लिकुड पार्टीच्या ३० पदांसाठी शेकडाे इच्छूक पाेस्टर-बॅनरसह मैदानात उतरले आहेत. त्यापैकी काही पदांची भरती नेतन्याहू यांच्या पसंतीनुसार हाेईल. त्यासाठी दाेन दावेदार निश्चित मानले जातात. आमिचाई चिकली, इदित सिल्मन अशी त्यांची नावे आहेत. दाेन्ही माजी पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांच्या यामिना पक्षात हाेत्या. त्यांनी बंड केल्याने आघाडी सरकार काेसळले हाेते. त्यामुळेच निवडणुकीची वेळ आली. लिकुड प्रायमरीसाठी नेतन्याहू यांना लढाईची गरज भासणार नाही. कारण ते पक्षातील सर्वमान्य नेते आहेत. गेल्या काही वर्षांत नेतन्याहू यांनी लिकुड पार्टीवर मजबूत पकड केली. त्यांनी आपले प्रतिस्पर्धींना अंतर्गत निवडणुकीत पराभूत केले किंवा त्यांची राजकीय पदांवर िनयुक्ती केली. तसेच काहींना पक्षाबाहेर केले आहे. त्यामुळे ते पक्षातील शक्तीशाली नेते असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले. वैयक्तिक दात्यांच्या एका लहान समुहाच्या जाेरावर नेतन्याहू यांनी स्वतंत्र राजकीय अभियान चालवण्याची तयारी केली आहे. त्यांचे संबंध अब्जाधीश अॅडेलसन कुटुंबाशी आहेत. कट्टर ऑनलाईन समर्थक गट देखील त्यांच्या विराेधकांचा समाचार घेताे. परंतु लिकुडमधील बेंजामिन यांच्या वाढत्या वजनाचे श्रेय निवडून येण्याच्या क्षमतेला द्यावे लागेल. त्यांनी स्वत: ला एक रहस्यमय जादूगार अशा स्वरूपात मांडले आहे. एकूण इस्रायलची निवडणूक सरकार विरूद्ध विराेधक अशी रंगणार आहे.
निवडणुकीच्या दृष्टीने नेतन्याहू यांच्यासमाेर काही अडचणी आहेत. फसवणूक, लाच घेणे इत्यादी प्रकरणात आराेपी असलेले नेतन्याहू यांच्यावर खटले सुरू आहेत. सिगारेट, शँपेन यासारख्या वस्तू नेतन्याहू यांनी लाच म्हणून घेतल्या. बातमी प्रकाशित करण्यासाठी माध्यमांतील पत्रकारांना राजकीय लाभ दिले. जबाबदारीसाेबत नेतन्याहू यांना अधून-मधून न्यायालयात हजर राहावे लागेल. ते दाेषी आढळून आल्यास त्यांना शिक्षा हाेऊ शकते. म्हणूनच पक्षाच्या म्हणण्यानुसार नेतन्याहू यांनी कायदा दुरूस्ती करावी. त्यामुळे नेतन्याहू यांच्यावरील सर्व आराेप रद्द हाेईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.