आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिकेत राहणारे ९५ वर्षांचे विल्बर श्रॅम हे कॅलिफोर्नियात वकिली करत आहेत. ते आपल्या कामावर प्रेम करतात आणि त्यांना कधीच निवृत्त व्हावे वाटत नाही. ग्रेट रेझिग्नेशन व अर्ली रिटायरमेंटच्या काळात कधीच निवृत्त न होण्याचा विचार बाळगणारे श्रॅम एकमेव नाहीत. असे हजारो आहेत. ते वयाच्या आठव्या किंवा नवव्या दशकात काम करत आहेत. त्यांची निवृत्तीची कोणतीच योजना नाही. काम करत राहण्याची या सर्वांची वेगवेगळी कारणे आहेत. काहींना आपल्या कामातून समाधान मिळते. काहींना वाटते की, काम करत राहिल्याने ते मानसिक व शारीरिकदृष्ट्या फिट राहतील. तर काही जण सेवानिवृत्ती परवडत नसल्याने काम करत आहेत, जेणेकरून आरोग्य विमा मिळत राहील. ८५ वर्षांचे कार्मिने रेंडे म्हणतात, मी अभियंता होतोे. अजूनही अनेक प्रकल्पांवर काम करत आहे. हे कामच मला जिवंत असल्याची जाणीव करून देते.
स्टॅनफोर्ड सेंटर ऑन लाँगिटिव्हिटीतील सहयोगी संचालिका मार्था जे डेव्ही सांगतात, ग्रेट रेझिग्नेशनच्या काळात द ग्रेट रिटर्नचा ट्रेंडही दिसत आहे. हजारो लोक निवृत्तीनंतरही कामावर परतत आहेत. अनेकांनी तर नवे कामही सुरू केले आहे. काही जण पार्ट टाइम करत आहेत, तर अनेक जण फुल टाइम काम करणारेही आहेत. त्या म्हणतात, ६५ ते ८४ वर्षांचे अनेक लोक निवृत्तीनंतर काम करू इच्छित होते, पण त्यांना काम मिळत नव्हते. तथापि, तरुणांनी नोकऱ्या सोडल्यानंतर अशा लोकांना संधी मिळाली. आता ते कधीच काम सोडणार नाहीत. हे लोक मागच्या पिढीपेक्षा जास्त निरोगी आहेत.
डेव्ही म्हणतात, अमेरिकेतील अनेक कॉलेजांनी ५० वर्षांवरील लोकांसाठी अभ्यासक्रम सुरू केला आहे. तथापि, सेवानिवृत्ती ही आयुष्य आपल्या पद्धतीने जगण्याची एक संधी असल्याचे अनेक लोक मानत आहेत.
वकील विल्बर श्रॅम निवृत्त लोकांना नवे काम करण्याच्या टिप्स देतात
{सर्वप्रथम निवृत्त झाल्यानंतर तुम्हाला काय करायचे आहे, हे ओळखावे. जे काम तुम्हाला आवडते तेच करा.
{मेहनतीला कोणताच पर्याय नसतो आणि कोणतेच वयही नसते. त्यामुळे निवृत्तीनंतरही मेहनत करण्यासाठी तयार राहा.
{आपल्या कुटुंबाशी कायम चांगले संबंध ठेवा. कुटुंबाची साथ नसेल तर या वयामध्ये तुम्ही काम करू शकणार नाही.
{स्वत:ला निरोगी ठेवा. नियमित व्यायाम करा. खानपानाकडे लक्ष द्या. शरीरामध्ये आजारांचा फैलाव होऊ देऊ नका.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.