आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
आशेचे माेठे उदाहरण म्हणजे के-२ ला कडाक्याच्या थंडीत सर करण्याची आमची जिद्द. दरवर्षी थंडीत गिर्याराेहण करण्यासाठी गिरिप्रेमी निघतात. भलेही आजपर्यंत त्यात कुणाला यश मिळालेले नाही. यंदा सेव्हन समिट ट्रॅकिंगची ५५ सदस्यीय टीम जगातील दुसऱ्या सर्वात उंच (८,६११ मीटर) शिखर गाठण्यासाठी निघाली. या एक्सपीडिशनचे नाव-मिशन इम्पाॅसिबल. या मिशनवरील दलाचे प्रमुख छांग दावा शेर्पा यांनी गिलगिट बाल्टिस्तानहून फाेनवरून याबद्दल माहिती दिली. जगभरात ८ हजार मीटर उंचीची अनेक शिखरे आहेत. थंडीच्या कडाक्यातही गिर्याराेहण करण्यात यशस्वी ठरलेल्या शिखरांमध्ये माउंट एव्हरेस्टचा समावेश आहे. अशी १३ शिखरे गिर्यारोहकांना नेहमी खुणावतात. परंतु एव्हरेस्टच्या के-२ चे शिखर अद्यापही अजेय. आम्ही आमचा प्रवास सुरू केलाय. फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत ही माेहीम पूर्ण हाेईल, अशी अपेक्षा आहे. यंदा आमच्या दलात २८ नेपाळी शेर्पा यांच्याशिवाय २७ परदेशी (अमेरिका, इंग्लंड, नेदरलँड, बल्गेरिया, स्पेन, स्वित्झर्लंड, फिनलंड, ग्रीस) गिर्याराेहक आहेत. यंदा हे शिखर गाठण्यात यश मिळेल, अशी आमची अपेक्षा आहे. सफरीच्या आव्हानांबद्दल छांग म्हणाले, शिखर चीन-पाक सीमेवर काराकाेरम पर्वतरांगेत आहे. गिर्यारोहकांना घसरून पडण्याची भीती क्षणोक्षणी वाटू लागते. एव्हरेस्टचा उंचीमुळे सन्मान आहे. परंतु के-२ एकमेवाद्वितीय. त्याच्या चढाईत यशस्वी होण्याचे प्रमाण नेहमी ३० टक्क्यांहून कमी असते. मग तुम्ही भलेही कितीही तयारी केलेली असो.
रणनीति : दरदिवशी २-३ तासांची चढाई करावी लागते
गिर्यारोहकांची आव्हाने बेस कॅम्पला पोहोचण्याच्या आधीपासूनच सुरू होतात. इस्लामाबादहून बेस कॅम्पला पोहोचण्याचा कालावधी ८ दिवसांचा आहे. रस्त्यात हॉटेल नाहीत. गिर्यारोहकांना स्वत:चे सगळे सामान स्वत:ला सोबत आणावे आणि बाळगावे लागते. पावलोपावली हिमस्खलनाचे संकटही असते. वादळी वारे वाहतात. दरदिवशी दोन ते तीन तास चढाई होते. बाकी वेळ हिमस्खलन असते किंवा हिमवादळाला तोंड द्यावे लागते. छांग म्हणाले, पाकिस्तान सरकारकडून सुविधा मिळाल्यानंतरही गिर्यारोहकांना खानपान, सामान इत्यादींवर सुमारे २१ लाख रुपये खर्च करावे लागतात.
के-2 जोखमीचे शिखर;चारपैकी एका गिर्यारोहकास गमावावे लागते प्राण
छायाचित्र के-२ पर्वताच्या बेस कॅम्पचे आहे. छायाचित्रातील निर्मल पुरजा एक टीम लीडर आहेत. त्यांनी ७ वर्षे १० महिने ६ दिवसांत जगातील सर्वात उंच १४ शिखरे यशस्वी सर केलेली आहेत.
दावा : ..तर भविष्यात अशक्य
८ हजार मीटरहून जास्त उंची असलेल्या शिखरावर विजय मिळवणाऱ्या सेव्हन समिट ट्रॅकचे चेअरमन मिंग्मा शेर्पा म्हणाले, येथील चढाईत यश मिळण्याची शक्यता सदासर्वकाळ ३० टक्क्यांहून कमी असते. हे दल शिखरापर्यंत पोहोचू शकले नाही तर कुणालाही ते जमणार नाही. १९५३ मध्ये अमेरिकी गिर्यारोहक जॉर्ज बेल यांनी के-२ विषयी मत व्यक्त केले होते. के-२ अत्यंत दुर्गम शिखर आहे. तो तुम्हाला मारण्याचा प्रयत्न करतो, असे त्यांनी म्हटले होते. जगातील धोकादायक शिखरांपैकी के-२ सर्वात जोखमीचा आहे. शिखरावर पोहोचणाऱ्या चारपैकी एकास प्राण गमवावे लागतात.
ब्लॅक पिरॅमिड कॅम्प-3 टेंट साइट 7300 मी. कॅम्प-2 : 6750 मीटर कॅम्प-1 : 5300 मीटर कॅम्प-4 7900 मी.बॉटलनेक 8200 मी. शिखर 8611 मी.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.