आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Even In Times Of Epidemics, The World Is Not Far Behind In Spending Money On Weapons, Spending Rs 150 Lakh Crore In A Year; News And Live Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:​​​​​​​महामारीच्या काळातही शस्त्रांवर पैसे खर्च करण्यात जग मागे नाही, वर्षभरात 150 लाख कोटी रुपये खर्च वाढला

स्टॉकहोम17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 2009 च्या मंदीनंतर सर्वाधिक खर्च, अव्वल पाच देशांत भारतही
  • सिपरी अहवाल : एका वर्षात वैश्विक सैन्य खर्च 2.6% वाढला

जगभरात कोरोना महामारी असूनही शस्त्रास्त्र स्पर्धा सुरूच आहे. एकूण वैश्विक खर्च वर्षभरात १५० लाख कोटी रुपये वाढला यातूनच त्याचा अंदाज लावता येतो. २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये त्यात २.६% वाढ झाली. स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट (सिपरी)च्या ताज्या अहवालात हा दावा करण्यात आला आहे. त्यानुसार गेल्या वर्षी सैन्य खर्चात देशांनी १४६ लाख कोटी रुपये खर्च केले. २००९च्या मंदीनंतर ही सर्वात मोठी वार्षिक वाढ आहे. २०२० मध्ये पाच सर्वाधिक सैन्य खर्च करणाऱ्या देशात अमेरिका, चीन, भारत, रशिया व इंग्लंडचा समावेश आहे. या देशांनी एकूण सैन्य खर्चाचा ६२% खर्च केला आहे. दरम्यान, चीनने सैन्य खर्च सतत २६ व्या वर्षी वाढवला आहे.

सिपरीच्या नुसार भारताचा सैन्य खर्च २०२०मध्ये २०१९च्या तुलनेत २% जास्त होता. यामागे भारताचे शेजारी देश पाकिस्तान व चीनसोबतचा सीमावाद आणि तणाव असू शकतो. सिपरीचे शस्त्र व सैन्य खर्च कार्यक्रमाचे संशोधक डॉ. डिएगो लोपेस द सिल्वा यांच्यानुसार, सन २०२० मध्ये महामारीचा मोठा प्रभाव सैन्य खर्चावर झाला नाही हे आम्ही निश्चितपणे सांगू शकतो. देश महामारीच्या दुसऱ्या वर्षीही असाच सैन्य खर्च कायम ठेवतात का हे बघण्याजोगे असेल.

एकूण सैन्य खर्चाचा ६२% खर्च फक्त ५ देशांनी केला; रशिया व ब्रिटनपेक्षा भारत पुढे
देश खर्च (रु. त)
अमेरिका 57 लाख कोटी
चीन 18.64 लाख कोटी भारत 5.39 लाख कोटी
रशिया 4.56 लाख कोटी
ब्रिटन 4.38 लाख कोटी

बातम्या आणखी आहेत...