आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Even More Than Food, Intestinal Digestive Juices Contribute To Malnutrition, But If They Flow, They Will Help Improve The Health Of Malnourished Children

दिव्‍य मराठी विशेष:आहारापेक्षाही आतड्यांमधील पाचक द्रव्ये कुपोषणासाठी कारणीभूत

ढाका2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जेवण, आहार एकसारखा, हवामानही समान तरीही एक मुलगा सुदृढ तर दुसरा कुपोषित. आहार हाच पोषणासाठी प्रमुख घटक असेल तर ही तफावत कशी ? यावर बांगलादेशातील शास्त्रज्ञांनी संशोधन केले. यात आहारापेक्षाही आपल्या आतड्यांमध्ये आढळणारे बॅक्टेरियल एन्झाइम (जिवाणू किंवा पाचक द्रव्य) हे पोषणासाठी कारणीभूत असल्याचे दिसून आले. या द्रव्यामुळे अन्नाचे पचन होते. हे एन्झाइम व्यवस्थित काम करत नसल्यास अन्न पचन होण्याऐवजी ते पोटात सडण्यास सुरुवात होते. ढाका येथील आयएसडीडीआर-बी संस्थेचे कार्यकारी संचालक तहमीद अहमद यांच्या मते, कुपोषण संपुष्टात आणण्यासाठी पाौष्टिकता वाढवणे ठीक आहे, परंतु त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे आतड्यांमधील पाचक द्रव्यांना सक्रिय करणे गरजेचे आहे. त्यामुळे अन्नपचन वेगाने होते. भलेही कितीही पोष्टिक आहार घेतला तरीही जोपर्यंत अन्नपचन होत नाही तोपर्यंत ते अंगी लागत नाही. त्यामुळे कितीही सकस, पोष्टिक आहार असला तरीही काही मुले कुपोषितच राहतात, असे अहमद म्हणाले. संशोधनाच्या वेळी कुपोषित मुलांच्या आतड्यांमधील पाचक द्रव्यांना सक्रिय करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यासाठी त्यांना एमडीसीएफ-2 (मायक्रोबायोटा डायरेक्टेड कॉम्प्लिमेंटरी फूड) देण्यात आले.

हे खाद्यपदार्थ स्थानिक पातळीवर सहज उपलब्ध होत असल्याने त्याचा उपयोग करण्यात आला. ते आतड्यांमध्ये असलेल्या पाचक द्रव्यांना जलदगतीने प्रवाही करतात. बांगलादेशातील मुलांना मोड आलेले हरभरे, भुईमुगाच्या शेंगा, सोयाबिन पिठासोबत हिरव्या केळींचा गर, साखर, सोयाबीन तेल आणि सूक्ष्म पोषक मिश्रण देण्यात आले. यामुळे मुलांच्या पचनक्रियेत लवकर सुधारणा झाली. व्हिटॅमिन आणि प्रोटीनचे प्रमाण संतुलित झाले. कुपोषित बालकास हा कडधान्याचा आहार रोज २५-२५ ग्रॅम दिला. शिवाय पूर्वी जो आहार होता तो तसाच कायम ठेवण्यात आला. लवकरच कुपोषणाचे प्रमाण कमी होऊन ते ठणठणीत झाले. बांगलादेशात हा प्रयोग यशस्वी होताच जागतिक आरोग्य संघटनेने भारत, माली, पाकिस्तान, टांझानियातही त्याची चाचणी केली. एमडीसीएफ-2 पोषण आहाराचा हा फॉर्म्युला यशस्वी झाल्यास जगभरातील कुषोषणाची समस्या संपुष्टात आणण्यासाठी त्याचा वापर केला जाऊ शकतो. मलावीतील जुळ्या मुलांवरही कुपोषण समस्येचा केला अभ्यास

संशोधक डॉ. गॉर्डन यांनी मलावीतील दोन जुळ्या मुलांवर कुपोषणाचा अभ्यास केला. एकाच वेळी जन्मलेल्या हे दोघे एकाच कुटुंबातील होते. दोघांच्या जेवणात सारखेच पदार्थ असत. तरीही एक सुदृढ तर दुसरा कुपोषित होता. गॉर्डन यांच्या अभ्यासानुसार अनेक जुळ्यांमधील एका मुलास क्वासरकोर (यात पोटातील स्नायूंची हालचाल मंदावते) व्याधी झाल्याचे दिसून आले. अन्न पचन करणारे आतड्यांमधील कोट्यवधी सूक्ष्म जिवाणू याला कारणीभूत असतात.

बातम्या आणखी आहेत...