आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएस्थर वोज्स्की या यूट्यूबच्या सीईओ सुझान यांच्या माता आणि अमेरिकन पत्रकार. त्यांचे माता-पिता रशियन ज्यू स्थलांतरित होते, जे १९३० मध्ये अमेरिकेत न्यूयॉर्कला आले. एस्थरने कॅलिफोर्निया विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतले. त्या एक यशस्वी माता मानल्या जातात. कारण त्यांच्या तिन्ही मुली मोठ्या पदांवर, मोठ्या जबाबदाऱ्या सांभाळतात. एस्थरकडूनच समजून घेऊया की मुलांचे कसे पालनपोषण करावे...
तुमच्या मुलांना मोबाइल वापरण्यासाठी प्रतीक्षा करण्याचे शिक्षण द्या माझी मुलगी सुझान ही यूट्यूबची सीईओ आहे. दुसरी मुलगी जेनेट डॉक्टर आहे आणि तिसरी ‘२३ अँण्ड मी’ या आरोग्य कंपनीची सहसंस्थापक. पुरुषप्रधान समाजात त्यांचे संगाेपन सोपे नव्हते. त्यांना आपण पुरुषांच्या बरोबरीचे आहोत, स्पर्धेत पुढे जाऊ शकताे याची जाणीव करून देणे हा माझा उद्देश होता. सर्व पालकांना आपल्या मुलांची प्रगती पाहायची असते, परंतु त्यांच्या संगोपनात काही चुका होतात. मूल मोठेपणी कसे होणार? याचा विचार त्यांनी करायचा असताे. शिस्त ही यशाची गुरुकिल्ली आहे. आता आपण इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या युगात जगत आहोत. ही उपकरणे त्यांना प्रगतीच्या पायऱ्या चढवू शकतात आणि बरबादही करू शकतात. मुलांना तंत्रज्ञानाची शिस्त लावणे ही पालकांची जबाबदारी आहे. त्याआधी स्वतःला शिस्त लावा. फोन कधी वापरायचा आणि कधी नाही हे पालकांनीही ठरवायला हवे. सर्वेक्षणानुसार, ३२% मुलांचे म्हणणे आहे की फोन वापरताना पालक त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत. तुमच्या मुलांना मोबाइल वापरण्यासाठी थांबायला शिकवा. एका संशोधनातून समोर आले आहे की, जी मुले बक्षिसाची वाट बघायला शिकतात, ती चांगली आयुष्य जगण्यासाठी मोठी होतात. मी माझ्या मुलींना पैसे वाचवायला शिकवले. त्यांची स्वतःची पिगी बँक होती. दर रविवारी वर्तमानपत्रात येणारी कुपनं आम्ही कापून ठेवत असू. त्यातून त्या काहीतरी साध्य करण्यासाठी प्रतीक्षा करण्यास शिकू लागल्या. मुलांना कंटाळा येऊ द्या. त्या वेळी त्यांना मोबाइलचा वापर करू देऊ नका. त्याऐवजी, मुलांना अापल्याला काय करायचे आहे याचा विचार करू द्या. मुलांबरोबर घरात मोबाइल-लॅपटॉप कधी वापरायचा याचा नियम बनवा. उदाहरणार्थ, जेवताना फोन वापरू नका.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.