आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजगात प्रत्येक ४० वे मूल जुळे म्हणून जन्माला येत आहे. आयव्हीएफ तंत्रज्ञानाद्वारे हाेणारा जन्म त्याचे सर्वात माेठे कारण मानले जाते. ह्यूम रिप्राॅडक्शन या नियतकालिकात प्रकाशित लेखात हा दावा करण्यात आला. वर्षात सुमारे १६ लाख जुळे जन्माला येतात. ही संख्या गेल्या ५० वर्षांत सर्वाधिक आहे. संशाेधकांनी त्यासाठी १३५ देशांतून २०१०-२०१५ या दरम्यानचे आकडे संकलित केले आणि त्याचे विश्लेषण केले.
जुळी मुले हाेण्याचा सर्वाधिक प्रमाण आफ्रिकेत दिसून येेते. आॅक्सफर्ड विद्यापीठातील प्राेफेसर क्रिश्टियान माँडेन म्हणाले, जुळ्या मुलांची संख्या जगात विसाव्या शतकाच्या मध्यानंतर तुलनेत आता सर्वात जास्त आहे. आता दरराेज ही संख्या वाढत जाईल. प्रगत देशांत १९७० च्या दशकापासून प्रजननासाठी मदत करणारे तंत्र अर्थात एआरटीचा उदय झाला. आता बहुतेक महिला वय वाढल्यानंतर माता हाेत आहेत. त्यातून जुळे मुले हाेण्याची शक्यता वाढते. गर्भनिराेधकाचा वापरही वाढला आहे. प्रजनन क्षमता हा घटक देखील त्यासाठी जबाबदार असल्याचे संशाेधकांना वाटते.
कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांत मुलांवर लक्ष देण्याची गरज
कमी आणि मध्य उत्पन्न असलेल्या देशांत जुळ्या मुलांवर आणखी जास्त लक्ष देण्याची गरज आहे. सहारा आफ्रिकेत जन्मल्याबराेबर वर्षभरातच जुळ्यातील एकास आपले प्राण गमवावे लागतात, असे अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. जगभरात ही संख्या २ ते ३ लाख एवढी असल्याचे संशाेधकांना वाटते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.