आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटन:सार्वजनिक कार्यक्रमामध्ये प्रत्येक तिसऱ्या मुलीची होते छेडछाड

लंडनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

संगीत उत्सवात आपण आनंद आणि समाधानासाठी जातो. परंतु अशा ठिकाणी हाेणाऱ्या छेडछाडीच्या घटना शांतताही हिरावून घेणाऱ्या ठरतात. ब्रिटनच्या डर्हम विद्यापीठातील संशाेधकांनी संगीत कार्यक्रमांमधील छेडछाडीच्या घटनांचा सखाेल अभ्यास केला. त्यावरून अशा कार्यक्रमाला जाणाऱ्या तीनपैकी प्रत्येकी एका मुलीला छेडछाडीला ताेंड द्यावे लागते. ३४ टक्के मुलींनी छेडछाड झाल्याचे मान्य केले आहे. छेडछाड केवळ मुलींची झाली असे नव्हे तर मुलांनाही अशा प्रसंगातून जावे लागल्याचे अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. गुन्हेगारीसंबंधी विषयातील अभ्यासक तथा प्राेफेसर हनाह बाॅज म्हणाल्या, म्युझिक फेस्टिव्हल एकांत जागी आयाेजित केले जातात. गुन्हेगारांना अशा ठिकाणी गुन्हेगारी कृत्य करणे सहज शक्य हाेते. छेडछाड करून ते गर्दीतून पसार हाेतात. पीडित मात्र तेव्हा कुठेही तक्रार करण्याच्या मन:स्थितीत नसतात. पार्किंग ते आयाेजनस्थळ यादरम्यान सर्वाधिक छेडछाड केली जाते. पाठलाग केला जाताे. अनेक वेळा बळजबरी स्पर्श करण्याचाही प्रयत्न केला जाताे. त्यानंतर आयाेजनस्थळीही छेडछाड केली जाते.

अनेक महिला उत्सवात जाणे टाळतात अनेक महिला उत्सवात जाणे टाळू लागल्या आहेत. काही महिलांनी उत्सवात मनमाेकळेपणाने हसणेदेखील बंद करून टाकले आहे. अनेक तरुणींनी उत्सव काळात मद्यपान करणे बंद करून टाकले आहे. अशा तरुणी दुर्गम ठिकाणी हाेणाऱ्या आयाेजनात एकटे जाणे टाळतात.

बातम्या आणखी आहेत...