आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Every Unemployed Person In The US Has A Job Opportunity, Yet Job Cuts Are Considered Amid Fears Of An Economic Recession.

राेजगाराच्या संधी:अमेरिकेत प्रत्येक बेराेजगाराकडे दाेन नाेकऱ्यांची संधी, तरीही आर्थिक मंदीच्या चिंतेतून नोकरकपातीचा विचार

वाॅशिंग्टन24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेत खासगी कंपन्यांनी ऑगस्टमध्ये १ लाख ३२ हजार नवीन नाेकऱ्या दिल्या. अनेक कंपन्या माेठ्या संख्येने नाेकरभरती करू लागल्या आहेत. त्यामुळे अमेरिकेतील प्रत्येक बेराेजगाराकडे नाेकरीच्या एक नव्हे तर दाेन संधी उपलब्ध आहेत. अमेरिकेच्या श्रम विभागाने जाहीर केलेल्या डेटानुसार जुलैच्या अखेरीस अमेरिकेत राेजगाराच्या संधी वाढून ही संख्या १.१० काेटींवर गेली. कारण श्रम बाजाराचा पुरवठा व गरज यात असंुतलन दिसून आले. या महिन्याच्या सुरुवातीला जुलैमधील बेराेजगारीचा अहवाल जाहीर झाला हाेता. त्यात बेराेजगारांच्या संख्येत घट हाेऊन ती ५०.७ लाखांवर आली आहे. अमेरिकेतील नियाेक्त्यांनी गेल्या महिन्यात चांगली तेजी आल्यानंतरही ऑगस्टमध्ये राेजगार देण्याचा वेग कमी केला हाेता. जुलैमध्ये ताे जास्त हाेता.

असे असले तरी काेराेनानंतरची हा नाेकऱ्यांतील वेग आहे, असे म्हणावे लागेल. गेल्या महिन्यात अमेरिकेतील राेजगारांत ३ लाख १५ हजारांनी वाढ झाली. जुलैमध्ये ५ लाख २६ हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाली हाेती. त्यानंतरही अमेरिकेत आर्थिक मंदी येण्याची भीती लाेकांना सतावू लागली आहे. गेल्या महिन्यात साेशल मीडियावर स्नॅप म्हणाले, कर्मचाऱ्यांचा पाचवा भाग वगळून टाकू. फेसबुकचे झुकेरबर्ग म्हणाले, कंपनीत एक गट आहे. त्याची कंपनीला कदाचित गरज नसेल. परंतु त्यांनी माेठ्या नाेकर कपातीची घाेषणा केलेली नाही.

एलन मस्क यांना हवे आठवड्यात ४० तास काम अॅपलचे बाॅस टिम कुक यांनीही एक मधला मार्ग काढावा, असे मत व्यक्त केले. सर्वांच्या विचारांत कुठेतरी अर्थव्यवस्थेबद्दलची जाेखीम दिसून येत हाेती. एलन मस्क यांनीही कर्मचाऱ्यांना आठवड्यातून किमान ४० तास कार्यालयात येऊन काम करण्याचे आवाहन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...