आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ढाका:इंदिराजींनी जे केले ते सर्वांना माहीत आहे... माझा पहिला सत्याग्रहही बांगलादेशसाठी होता : मोदी

ढाकाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बांगलादेश दौरा. त्याचा परस्पर संबंध असो की नसो, शुक्रवारी ढाका येथे जाऊन मोदींनी बंगाल, बांगलादेश, बांगलादेशी नागरिक आणि ‘वंग-बंधू’ (शेख मुजीबुर्रहमान) यांच्याशी संबंध जोडण्याची संधी सोडली नाही. ते बांगलादेशच्या स्वातंत्र्याच्या ५० व्या वर्धापन दिन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून गेले होते. तेथे त्यांनी भाषणात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे स्मरण केले.

मोदी म्हणाले, ‘इंदिरा गांधी यांनी (बांगलादेश मुक्तिसंग्रामात) जे केले ते सर्वांना माहीत आहे. तेव्हा अटलजींनीही म्हटले होते, ‘ज्यांनी मुक्तिसंग्रामात प्राण अर्पण केले फक्त त्यांच्यासाठीच आपण लढत नाही आहोत, तर आपण इतिहासाला नवी दिशा देण्यासाठी लढत आहोत.’ नंतर मोदी म्हणाले, “१९७१ मध्ये बांगलादेश स्वतंत्र झाला तेव्हा माझे वय २०-२२ वर्षे असेल. तेव्हा बांगलादेशच्या मुक्तियोद्ध्यांवर पाकिस्तानी लष्कराच्या अत्याचारांची छायाचित्रे पाहून मी आणि माझे सहकारी अस्वस्थ झालो होतो. तेव्हा आम्ही बांगलादेश मुक्तियोद्ध्यांच्या समर्थनार्थ सत्याग्रह केला होता. त्यामुळे मला तुरुंगातही जावे लागले. तो माझ्या जीवनातील पहिला सत्याग्रह होता.’

दौऱ्यावर गेलेल्या सर्वांसाठी खास ‘मुजीब जॅकेट’
- मोदींनी शेख मुजीबुर्रहमान यांना ‘गांधी शांतता पुरस्कारा’ने सन्मानित केले. मुजीबुर्रहमान यांची धाकटी कन्या रेहाना यांनी मोठी बहीण आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीनांसोबत हा पुरस्कार स्वीकारला.
- या कार्यक्रमात मोदी आणि त्यांच्यासोबत गेलेले प्रतिनिधी यांनी खास ‘मुजीब जॅकेट’ परिधान केले होते. ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाने असे १०० जॅकेट दिल्लीहून खास मागवले होते.

बातम्या आणखी आहेत...