आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअॅथलिटिक ग्रीन्स, डेली ग्रीन्स, सुपर ग्रीन्स, ग्रीन पावडर यासारख्या असंख्य सुपरफूडच्या जाहिराती सोशल मीडिया आणि वेबसाइटवर मोठ्या प्रमाणात आहेत. फक्त एक स्कूप पाण्यात मिसळून ते घ्या, दिवसभराचे पोषक घटक त्यातून मिळतील, असा दावा केला जात आहे. तणाव कमी होणे, प्रतिकारशक्ती वाढणे, पचनक्रियेत सुधारणा आणि प्रचंड ऊर्जा या सुपरफूडने मिळते, असाही दावा केला जात आहे. तज्ज्ञांनी मात्र हे दावे फेटाळले आहेत.
न्यूयॉर्क यूनिव्हर्सिटीतील फूड स्टडीज आणि सार्वजनिक आरोग्याच्या तज्ज्ञ डॉ. मॅरियन नेस्ले सांगतात, ही उत्पादने लोकांना फक्त आकर्षित करतात. तुम्हाला वाटते का की हे एवढे सोपे आहे? चांगल्या आरोग्यासाठी पोषणाशी संबंधित आहाराची एक स्कूपपेक्षा खूप अधिक गरज असते. साधारणपणे या सुपरफूड्समध्ये व्हिटामिन ई आणि सी (अँटिऑक्सिडंट), बायोटिन (चयापचयात साह्यकारी - व्हिटॅमिन बी ७), व्हिटॅमिन बी १२ (रक्त आणि मज्जातंतू धारासाठी) आणि मिनरल्स असतात. काहींमध्ये प्लँट प्रोटीन (मटार प्रोटीन किंवा ब्राऊन राइस प्रोटीन पावडर) पालक आणि ब्रोकोलीसारख्या भाज्यांचे पावडर असते. काही अॅडप्टोजेन (तणाव कमी करण्यात साह्यकारी) जसेे अश्वगंधा, रेशी मशरूम, जिनसेंग आणि रोडियोला, प्रचंड ऊर्जा देण्यासह विविध आजारांसाठी उपयुक्त समजले जातात. सिंहपर्णीच्या मुळी, गुलाबाचे फळ आणि काटेरी दूध फुले पोटाचे आरोग्य चांगले ठेवतात, असा दावा केला जातो. मात्र हे फक्त दावेच आहेत. अमेरिकी एफडीएनेही याचेे मूल्यांकन केलेले नाही. त्यामुळे त्यांच्यापासून होणाऱ्या फायद्यांबाबतही शंका आहे.
हार्वर्ड मेडिकल स्कूलचे डॉ. पीटर कोहेन सांगतात,‘संतुलित आहार घेत असाल तर अशा सप्लिमेंटची गरज नाही.’ डॉ. नेस्ले सांगतात, की ब्रोकोली किंवा पालकसारख्या भाज्या पावडर रूपात दिल्याने काही व्हिटॅमिन आणि आवश्यक पोषक घटक नष्ट होतात. त्या मूळ स्वरूपात खाल्ल्यास फायदा होऊ शकतो. तरीही पावडर घ्यायचे असेल तर काही अडचण नाही, मात्र त्यापासून फायदा तर होणारच नाही.
यांच्या प्रभावावर कोणतीही क्लिनिकल चाचणी नाही, हानीदेखील शक्य आहे : तज्ज्ञ
बहुतेक सुपरफूड पावडरमध्ये दैनंदिन गरजेपेक्षा जास्त जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. उदाहरणार्थ, यूएसमध्ये उपलब्ध असलेल्या एजी-१ ग्रीन पावडरमध्ये शिफारस केलेल्या दैनंदिन प्रमाणापेक्षा ५५०% अधिक व्हिटॅमिन ई आणि ११००% अधिक बायोटिन आहे. जॉन्स हॉपकिन्स येथील गॅस्ट्रो तज्ज्ञ गेरार्ड मुलिन म्हणतात, ‘शरीर बहुतेक पोषक घटक हाताळू शकते, परंतु काही प्रक्रिया करताना मूत्रपिंड खराब होऊ शकतात. अ, ड आणि ई जीवनसत्त्वांचा अतिरेक देखील हानिकारक आहे. त्यांच्या प्रभावाबाबत कोणत्याही क्लिनिकल चाचण्या झाल्या नाहीत. म्हणजेच भावनांचा गैरफायदा घेण्याशिवाय हे सर्व काही नाही.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.