आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

चिंता वाढली:कोरोना उपचारात अँटिबायाेटिक्सचा जास्त वापर जीवघेणा : डब्ल्यूएचओ

जिनेव्हा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गरीब देशांमध्ये अँटिबायोटिक आणि अँटिमायक्राेबायल औषधांचा बेसुमार वापर

कोरोनाचा सामना करण्यासाठी अँटिबायोटिकच्या जास्त वापरावर डब्ल्यूएचओने इशारा दिला आहे. डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रोस गेब्रेयेसस यांनी माध्यमांना सांगितले की, अँटिबायोटिक्स औषधांच्या जास्त वापरामुळे धोकादायक विषाणूची प्रतिकारक्षमता वाढते. तो जीवघेणा ठरू शकतो. खरे म्हणजे अँटिबायोटिक्स औषधांच्या सेवनाने काही काळानंतर विषाणू मजबूत होतात. गेब्रेयेसस यांनी सांगितले की, केवळ त्याच कोरोना रुग्णांच्या उपचारात अँटिबायोटिक औषधांची गरज असते, ज्यात विषाणूच्या संसर्गाचा धोका जास्त असतो. असे रुग्ण कमी असतात. कमी गंभीर कोरोना रुग्णांना अँटिबायोटिक थेरपी द्यायला नको. गेब्रेयेसेस यांनी सांगितलेे की, अँटिमायक्रोबायल प्रतिकार करण्याचा धोका ही आपल्या काळातील सर्वात मोठे आव्हान आहे. जगाने गंभीर पद्धतीने अँटिमायक्रोबायल औषधांचा वापर करण्याची क्षमता गमावली असल्याचे स्पष्ट आहे. तर अनेक गरीब देशांमध्ये या औषधांचा खूप वापर होत आहे.

वृत्तांत : डब्ल्यूएचओला डेटा देण्यास चीन करायचा टाळाटाळ

वॉशिंग्टन : कोरोना संशोधनाचा डेटा न दिल्याने डब्ल्यूएचओदेखील चीनमुळे त्रस्त झाली होती. वृत्तसंस्था असोसिएट प्रेसने (एपी) आपल्या वृत्तात हा दावा केला आहे. त्यात म्हटले आहे की, डब्ल्यूएचओलाही चीन संशोधन डेटा देण्यास टाळाटाळ करत होता. चीनने कोरोनाशी संबंधित जेनेटिक मॅप, जिनोमची संरचनेशी संबंधित महत्त्वाचे तथ्य अनेक आठवडे लपवले होते. चीनने संशोधनाची माहिती डब्ल्यूएचओपासून लपवल्याचीही शंका आहे. डेटा देण्यावरून डब्ल्यूएचओचे अधिकारी आणि चिनी आरोग्य मंत्रालयादरम्यान ई-मेलद्वारे अनेक वेळा चर्चा झाली होती. डब्ल्यूएचओने एका मेलमध्ये लिहिले आहे की, चीनच्या अशा वागण्यामुळे लस संशोधन सुरू करण्यात उशीर झाला. डब्ल्यूएचओला डेटा देण्याआधी चीनच्या शासकीय माध्यमात तो उपलब्ध असायचा. त्यांना महत्त्वाचा डेटा मिळण्याच्या १५ मिनिटांच्या आतच तो चीन मीडियाला कसा मिळतो, असा प्रश्न डब्ल्यूएचओच्या अधिकाऱ्यांनी विचारला होता.

इशारा : डब्ल्यूएचओने म्हटले - कोरोना कमकुवत झाला नाही

डब्ल्यूएचओचे कार्यकारी संचालक माइक रियान यांनी इटलीच्या डॉक्टरचा दावा फेटाळत सांगितले की, कोरोना कमजोर झालेला नाही. यामुळे हलगर्जी करायला नको. इटलीचे वरिष्ठ डॉ. अल्बर्टो जँगरिलो यांनी सांगितले होते की, त्यांच्या देशात वैद्यकीयदृष्ट्या कोरोनाचे अस्तित्व संपले आहे. गेल्या दहा दिवसांत केलेल्या स्वॅब टेस्टमध्ये हे आढळले आहे. डब्ल्यूएचओच्या एपिडेमियोलॉजिस्ट मारिया वान यांनीही सांगितले की, आतापर्यंत पुरावा आढळला नाही की, ज्यात म्हणता येईल की कोरोनाची स्थिती बदलली आहे. कोरोनाचा प्रसार पूर्वीप्रमाणेच होत आहे.

0