आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संशोधन:व्यायामामुळे वाढत्या वयात होणारे त्रास कमी होतात, महिलांना जास्त लाभ

सॅन दिएगो24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाढत्या वयाबरोबर मानसिक आरोग्य राखण्यासाठी बुद्धी आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहणे हा प्रभावी उपाय मानला गेला आहे. एका आठवड्यात पंधरा मिनिटे वेगाने चालणे, सायकलिंगसारखे शारीरिक व्यायाम केल्यास व्यक्तीच्या मेंदूचे कार्य योग्य पद्धतीने राखता येऊ शकते. त्याचा लाभ पुरुषांच्या तुलनेत महिलांना जास्त प्रमाणात होतो. बुद्धी वेगाने विचार करण्यास सक्षम असल्यास व्यक्ती केवळ नियोजनच नव्हे तर अडचणींवरही मात करू शकते. एखादे काम करतानाच इतरांसोबत सहज संवाद साधण्याची क्षमतादेखील कायम राहते. युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफाेर्नियाच्या स्कूल ऑफ मेडिसिनच्या संशोधनातून समोर आली आहे. हे अध्ययन अमेरिकन अकॅडमी ऑफ न्यूरॉलॉजीच्या नियतकालिकात प्रकाशित झाली आहे.

पुरुषांच्या तुलनेत सक्रिय महिलांमध्ये वेगवान विचार
अध्ययनात प्रोफेसर ज्युडी पा यांना काही तथ्ये आढळून आली. सक्रिय महिला पुरुषांच्या तुलनेत वेगाने विचार करू शकतात. या प्रयोगात सरासरी ७६ वर्षांच्या ७५८ लोकांच्या शारीरिक, मानसिक अशा साप्ताहिक नोंदी करण्यात आल्या.

बातम्या आणखी आहेत...